Home /News /maharashtra /

Jalgaon News : विजेची हाय होल्टेज तार शेतात कोसळली, 35 बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Jalgaon News : विजेची हाय होल्टेज तार शेतात कोसळली, 35 बकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

विद्युत तार बकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्‍या तारेच्या कम्पाऊंड आणि बकऱ्यांवर पडली. यामुळे संपूर्ण कम्पाउंडमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता.

    इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 12 एप्रिल : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील नांद्रा इथं शेतात बकऱ्यांच्या कम्पाऊंडवर हायहोल्टेज विजेची तार तुटून पडली. त्यामुळे 35 बकऱ्यांचा (35 goats dead) होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुदैवाने विजेची तार झोपडीच्या बाजूला पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. उन्हाळ्याचे दिवस असल्‍याने शेळ्या-बकऱ्या शेतात बसविले जातात. त्‍यानुसार भिल्‍ल समाजातील व्यक्‍तीने दीडशे बकऱ्या गावातील रवींद्र देशमुख यांच्या शेतात बसविल्‍या होत्‍या. पण आज पहाटे मोठा अनर्थ झाला. चालू लाईनवरील विद्युत तार अचानक तुटून पडली. यात 35 बकऱ्यांचा मृत्‍यू झाला. हनुमानाचा जन्म आमच्याच भूमीत! दोन राज्यांमध्ये पेटला वाद राणीचे बांबरूड येथील राजाराम सखाराम भिल्‍ल यांच्या 150 बकऱ्या जुने शिवारात रवींद्र देशमुख यांच्या शेतात बसविण्यात आल्‍या आहेत. येथेच बकऱ्यांसाठी वेगवेगळे तार कंपाउंड तयार करण्यात आले आहे. तर त्‍याच्याच बाजूला राहण्यासाठी दोन झोपड्या तयार करण्यात आल्‍या आहेत. याच ठिकाणाहून हाय होल्‍टेजची विद्युत लाईन गेलेली आहे. राजाराम भिल्‍ल यांच्या झोपड्यांच्यावरून हाय होल्‍टेजची विद्युत लाईन गेलेली आहे. सकाळी सातच्या सुमारास मेन लाईनच्या खांबावरील क्लॅम तुटल्यामुळे विजेचा तार खाली पडली. यात विद्युत प्रवाह चालू होता. ही तार झोपडीच्या बाजूला पडल्‍याने मोठा अनर्थ टळला. तार झोपडीवर पडली असता, स्‍पार्किंगमुळे झोपडीला आग लागण्याची शक्‍यता होती. शिवाय सकाळी भिल्‍ल परिवाराची बाहेर धावपळ सुरू असल्‍याने शॉक लागून काही घटना घडण्याची शक्‍यता होती. परंतु, सुदैवाने हा अनर्थ टळला.‍ IPL 2021 : KKR विरुद्धच्या मॅचआधी मुंबईसाठी खूशखबर, महत्त्वाचा खेळाडू उपलब्ध विद्युत तार बकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्‍या तारेच्या कम्पाऊंड आणि बकऱ्यांवर पडली. यामुळे संपूर्ण कम्पाउंडमध्ये विद्युत प्रवाह गेल्‍याने शेतातील 35 बकऱ्यांचा होरपळून मृत्‍यू झाला. बकऱ्या विकून उदरनिर्वाह करत होते. अशात 35 बकऱ्यांचा मृत्‍यू झाल्‍याने मोठे नुकसान झाले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या