मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon Crime: सासरच्यांना गुंगीचे औषध दिले आणि मग....; 8 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या सुनेचा कांड वाचून व्हाल हैराण

Jalgaon Crime: सासरच्यांना गुंगीचे औषध दिले आणि मग....; 8 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या सुनेचा कांड वाचून व्हाल हैराण

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Jalgaon News: पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीतील रहिवासी असलेल्या आणि सेंट्रीग काम करत असलेल्या राहुल याचा विवाह धुळे येथील एक एजंटामार्फत नुकताच झाला होता.

  • Published by:  Sunil Desale
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी 9 एप्रिल : आठ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या सुनेने सासरच्या मंडळीला पाण्यात गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर लोखंडी रॉडने पती, सासू आणि सासऱ्यास बेदम मारहाण केली. ही घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) येथे घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नववधूचा चौथा विवाह नवविवाहितेचा पहिला, दुसरा नाही तर हा चौथा विवाह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीतील रहिवासी असलेल्या आणि सेंट्रीग काम करत असलेल्या राहुल पाटील याचा विवाह धुळ्यातील एक एजंटामार्फत नुकताच झाला होता. यासाठी एजंटने 1 लाख 75 हजार रुपये सुद्धा घेतले होते. नववधू ही परभणी येथील निवासी आहे. वाचा : मांजरीला काठीने मारहाण करुन केलं ठारं, पुण्यातील महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केवळ पैशांसाठी हा चौथा विवाह करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. 9 मार्चला विवाह झाल्यानंतर केवळ आठच दिवसात नवविवाहितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. घरातील कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे तिला बस स्थानकावरून परत आणले होते. मात्र तिला करमत नसल्याच्या कारणाहून माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेले वडील साहेबराव यांनी मी तिला माहेरी घेऊन जातो असे सांगितले. पण सासरच्या मंडळींनी तिला माहेरी नेण्यासाठी नकार दिला. वाचा : जळगावात हत्या सत्र सुरूच; दगडाने ठेचून एकाची हत्या, 15 दिवसांतील चौथी घटना दरम्यान पुन्हा तीन दिवस थांबून साहेबराव आणि त्यांच्या नवविवाहित मुलीने रात्री पळून जाण्याचा कट शिजवला. त्यानुसार, 28 मार्च रोजी रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात गुंगीचे औषध देऊन झोपेत पळून जाण्याचा बेत केला होता. रात्री दीड वाजता वडील आणि मुलगी पळून जात असताना अर्जुन उखा पाटील यांना अचानक जाग आली. त्यांनी सुन आणि व्याह्यास हटकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी राहुल, वडील अर्जुन आणि त्यांच्या पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण केली होती. या मारहाणीत अर्जुन उखा पाटील हे गंभीर झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपचार घेत असतांना त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मारहाण करणारी सुन ही अल्पवयीन असल्याने तिला जळगाव येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून तिच्या वडीलांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
First published:

Tags: Crime news, Jalgaon, Murder

पुढील बातम्या