मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ खडसेंवर घणाघाती आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 'त्या' कार्यकर्त्याबाबत जिल्हाध्यक्षांनीच केला खुलासा

एकनाथ खडसेंवर घणाघाती आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 'त्या' कार्यकर्त्याबाबत जिल्हाध्यक्षांनीच केला खुलासा

राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आरोप करणाऱ्या प्रफुल्ल लोढा यांच्याबाबत वेगळाच खुलासा केला आहे.

जळगाव, 27 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल अपशब्द वापरत हल्लाबोल करणारे प्रफुल्ल लोढा यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भुसावळ येथे अष्टभुजा मंदिराजवळ प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन व जोडे मारो आंदोलन करण्यात आले. मात्र पुतळा दहन करण्यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आरोप करणाऱ्या प्रफुल्ल लोढा यांच्याबाबत वेगळाच खुलासा केला आहे. 'एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करणारे प्रफुल्ल लोढा म्हणत आहेत की मी इथं पक्ष वाढवला. पण ते पक्षाचे साधे सभासदही नाहीत. त्यामुळे लोढा यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते,' असं म्हणत रवींद्र पाटील यांनी लोढा यांचा समाचार घेतला आहे. दरम्यान, ईडीची नोटीस आल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच जळगाव येथील राष्ट्रवादीचे कथित कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार आरोप केले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल लोढा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी यांच्या नेतृत्वात प्रफुल्ल लोढा यांचा तीव्र निषेध करत केला. तसंच लोढा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत होते, मात्र पोलिसांनी पुतळा दहन करण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
First published:

Tags: Eknath khadse, Jalgaon, NCP

पुढील बातम्या