जळगाव पालिकेचा दारू लाॅबीला दणका, हायवे लगतच्या दारू दुकानांना टाळं कायम

जळगाव पालिकेचा दारू लाॅबीला दणका, हायवे लगतच्या दारू दुकानांना टाळं कायम

जळगाव महापालिकेनं शहराच्या हद्दीतून जाणारा हायवे ताब्यात घेण्यास नकार दिलाय. तसा ठरावही महापालिकेनं मंजूर केलाय

  • Share this:

प्रशांत बाग, जळगाव

05 मे : जळगाव महापालिकेनं दारू लॉबीला दणका दिलाय. जळगाव शहरातून जाणारा हायवे राज्य सरकारच्याच ताब्यात द्यावा असा ठराव महापालिकेनं केलाय. त्यामुळे शहरातल्या हायवेवरील दारु दुकानांना कायमचं टाळं लागलंय.

हायवेवर दारुबंदी झाल्यानंतर शहरांमधील हायवेच ताब्यात घेण्यासाठी महापालिकांमध्ये चढाओढ लागली होती. राज्य सरकारही बारधार्जिणी भूमिका घेत असल्याचं दिसत होतं. पण जळगाव महापालिका याला अपवाद ठरलीये. जळगाव महापालिकेनं शहराच्या हद्दीतून जाणारा हायवे ताब्यात घेण्यास नकार दिलाय. तसा ठरावही महापालिकेनं मंजूर केलाय. महापालिकेतले तीन नगरसेवक वगळता सगळ्याच नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलंय. एवढंच नाही यासाठी आमदारांनी पाठपुरावा करावा अशी विनंतीही महापौरांनी केलीये.

जळगाव शहरातल्या हायवेलगत दारुची 45 दारुची दुकानं आहेत. या ठरावामुळे या दारुच्या दुकानांना कायमचं टाळं लागणार आहे. जळगाव महापालिकेनं घेतलेली ही जनताभिमूख भूमिका इतर महापालिका घेणार का याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 09:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading