मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जळगावात भाजपला धक्के पे धक्का, मतदानाच्या काही तासांपूर्वी आणखी एक गट सेनेत दाखल!

जळगावात भाजपला धक्के पे धक्का, मतदानाच्या काही तासांपूर्वी आणखी एक गट सेनेत दाखल!

विशेष म्हणजे, जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत दाखल झाले आहे

विशेष म्हणजे, जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत दाखल झाले आहे

विशेष म्हणजे, जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत दाखल झाले आहे

जळगाव, 18 मार्च : जळगाव महापालिका  महापौर निवडणुकीच्या (Jalgaon Municipal Corporation Mayor Election) हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेनं (Shivsena) जोरदार सर्जिकल स्ट्राईक करून भाजपचे (BJP) 30 नगरसेवक आपल्या तंबूत आणले आहे. पण, आता भाजपला आणखी एक धक्का बसला असून आणखी एक गट शिवसेनेत दाखल झाला आहे.

जळगाव महापालिकेत आज सकाळी 11 वाजता ऑनलाइन पद्धतीने महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे.  भाजपचा एक गट हा निवडणूक अगोदरच शिवसेनेला जाऊन मिळाला आहे. त्यामुळे आज जळगावात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री महाजन तर भाजप मधील बंडखोर उमेदवार उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांचे नाव निश्चित केले आहे.

लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी म्हणून इंजिनिअर बनला तस्कर; भाजी विक्रीआड विकायचा गांजा

भाजपातर्फे महापौर पदासाठी प्रतिभा कापसे तर उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत जवळपास शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे. कारण जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि खा. विनायक राऊत हे नेतृत्व करत असल्याची माहिती मिळाली असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पूर्ण ताकद लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

On This Day : कार्तिकचा शेवटच्या बॉलवर सिक्स आणि टीम इंडियाला विजेतेपद!

विशेष म्हणजे, जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हादरा देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने 57 पैकी तब्बल 30 नगरसेवक सेनेत दाखल झाले आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.  शिवसेनेच्या तंबूत गेलेल्या फुटीर नगरसेवकांना व्हीप न बजावता आल्यानं भाजपाने कोर्टात याचिका दाखल केली आणि महासभा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन घेतली तर व्हीप  बजावता येईल, अशी भूमिका मांडली. परंतु,औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका  फेटाळून लावली आहे. कोरोना परिस्थिमुळे निवडणूक ऑनलाइन घेण्यासाठी कोर्टाने आदेश दिले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

दोन दिवसांपूर्वीच भाजप नगसेवकांनी गाठले ठाणे!

जळगाव महापालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक 18 मार्च रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी भाजपला शिवसेनेनं 27 नगरसेवक फोडून सुरूंग लावला.  शिवसेनेनं फोडलेले सर्व 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे. सर्व नगरसेवक ठाण्यातूनच ऑनलाईन मतदान करणार आहे. 27 नगरसेवक सेनेत दाखल झाल्यानंतर आणखी 5 नगरसेवक शिवसेनेला येऊन मिळाले होते. त्यामुळे भाजपकडे असलेले 57 नगरसेवकांपैकी अर्धे नगरसेवक सेनेच्या गळाला लागले आहे. त्यामुळे जळगावात सांगली पॅटर्न होणार हे आता निश्चित आहे.

First published:
top videos