जळगाव लोकसभा निवडणूक : भाजप विजयाची परंपरा राखणार का?

जळगाव लोकसभा निवडणूक : भाजप विजयाची परंपरा राखणार का?

उत्तर महाराष्ट्रातली जळगावची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. 1999 पासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत इथे भाजपचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजप ही विजयाची परंपरा राखणार का, याची चर्चा आहे.

  • Share this:

जळगाव, 18 मे : उत्तर महाराष्ट्रातली जळगावची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. 1999 पासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत इथे भाजपचा विजय झाला आहे. भाजपने यावेळी इथून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना रिंगणात उतरवलं.

भाजपने या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा स्मिता वाघ यांना तिकीट दिलं होतं. स्मिता वाघ यांनी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला पण पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द केली आणि उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली.

जळगावमध्ये गेली दोन दशकं जळगावमध्ये भाजप शिवसेनेचा दबदबा आहे. पण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने ही जागा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आता या लढतीत कोण विजय झालं हे 23 मे ला कळेल.

जळगावमध्ये 23 एप्रिलला तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं. इथे 56.19 टक्के मतदानाची नोंद झाली.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसवर मात

मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इथे मोठा विजय मिळाला. भाजपचे नेते ए.टी. नाना पाटील यांनी काँग्रेसचे नेते डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला. ए.टी. नाना पाटील यांना 6 लाख 47 हजार 773 मतं मिळाली तर सतीश पाटील यांना 3 लाख 83 हजार 525 मतं मिळाली.

भाजपचा विजयरथ

जळगावमध्ये काँग्रेस भाजपचा विजयरथ रोखू शकलेलं नाही. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत इथून ए. टी. नाना पाटील खासदार म्हणून निवडून आले.

जळगावमध्ये जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव आणि पाचोरा हे विधानसभा मतदारसंघ येतात. या सगळ्या विधानसभा मतदारसंघांत भाजप आणि काँग्रेसला कसा प्रतिसाद मिळाला ते पाहावं लागेल.

==============================================================================

मोदींच्या भाषणावर प्रियांका गांधींचं मार्मिक ट्विट, महत्त्वाच्या 18 घडोमोडींचा वेगवान आढावा

First published: May 18, 2019, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading