पतीने हनिमूनला गेल्यावर पत्नीसोबत केलं असं कृत्य की थेट गुन्हाच दाखल झाला!

पतीने हनिमूनला गेल्यावर पत्नीसोबत केलं असं कृत्य की थेट गुन्हाच दाखल झाला!

पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

जळगाव, 14 नोव्हेंबर : हनिमूनला गेल्यावर पतीने पत्नीला चक्क हुक्का आणि बिअर पिण्यासाठी जबरदस्ती केल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील हा प्रकार असून याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाह जुळल्यापासून पतीसह सासरच्या व्यक्तींनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सुरुवातीच्या काळात या मंडळींनी माझ्या मागे पैशांसाठी तगादा लावला. लग्नाच्या दिवशीच माझ्याकडे 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तसंच नंतर लग्नात माझ्या मेकअपसाठी लागलेले पैसेही सासरची मंडळी मागू लागली आणि त्यासाठी माझा छळ करण्यात आला, असा आरोप पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.

महाबळेश्वर...हनिमून आणि हुक्का

पीडित महिलेच्या दाव्यानुसार ती आपल्या पतीसह महाबळेश्वर इथे हनिमूनसाठी गेली होती. त्यावेळी पतीने मला हुक्का आणि बिअर पिण्यासाठी जबरदस्ती केली, असा या महिलेचा दावा आहे.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी तिचा पती भूषण मोरे, सासू कमल मोरे, सासरा दिनकर मोरे आणि नणंद वैशाली मोरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, आपला समाज प्रगतीकडे वाटचाल करत असून वाईट प्रथांना मागे सोडत आहे, असा दावा अनेकदा केला जातो. मात्र जळगावसारख्या या घटनांमुळे अशा दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

Published by: Akshay Shitole
First published: November 14, 2020, 7:51 PM IST

ताज्या बातम्या