Home /News /maharashtra /

Jalgaon: घराचा दरवाजा उघडताच आई रक्ताच्या थारोळ्यात आढळली, पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Jalgaon: घराचा दरवाजा उघडताच आई रक्ताच्या थारोळ्यात आढळली, पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यात एका महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यात धक्कादायक माहिती उघड झाली.

जळगाव, 4 मार्च : उत्तर महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावात (Jalgaon) एक विवाहित महिला आपल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळली आहे. घराच्या दरवाजाला बाहेरुन कुलूप लावण्यात आले होते. यामुळे हत्येचं गूढ आणखीनच वाढलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जळगाव जिल्ह्यातील सप्तश्रृंगीनगर (Shraptashrungi Nagar) येथे ही घटना घडली आहे. मृतक महिलेचं नाव सुनिता संजय महाजन असे आहे. त्या 46 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास सुनिता महाजन या आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. सुनिता यांचा मुलगा दुपारी कामावरुन घरी आला तेव्हा घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता. वाचा : महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून निघाले 6 कोटींचे ड्रग्स; 88 कॅप्सूल्स पाहून हैराण दरवाचाचे कुलूप उघडताच... दरवाजाचे कुलूप उघडून सुनिता यांच्या मुलाने घरात प्रवेश केला आणि त्याला एक मोठा धक्का बसला. कारण, घरात सुनिता या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. हे पाहताच मुलाने जोरदार आरडा-ओरड सुरू केला आणि मग शेजाऱ्यांनीही एकच गर्दी केली. सुनिता महाजन यांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आपला तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. महिलेची हत्या करुन घराला बाहेरुन कुलूप लावून पळणारा व्यक्ती हा महिलेच्या परिचयाचा किंवा घरातील व्यक्ती असावा असा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी आपला तपास केला. वाचा : 2 मित्र एकमेकांच्या पत्नीच्या प्रेमात पडले, लग्नही केलं; मात्र एकाची आत्महत्या आरोपी अटकेत पोलिसांनी मृतक महिलेच्या पतीची माहिती काढून त्याची विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पतीनेच हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. आरोपी पती संजय महाजन याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात लाकडी पाटीने वार करून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. सुनिता यांचा पती संजय यास रावेर पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता पतीनेच हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. जळगावात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Jalgaon, Murder

पुढील बातम्या