इम्तियाज अहमद, प्रतिनिधी
जळगाव, 20 जुलै: पेन आणि डायरी मागण्याच्या बहाण्याने पतीच्या खिशातून पैसे लांबवणाऱ्याला वृद्ध आजींनी चांगलाच धडा शिकवला आहे. आरोपीने वृद्ध इसमाच्या खिशातून 3 हजार 500 रुपये लांबवणाचा प्रयत्न केला. यावेळी या वृद्ध दाम्पत्याने (elderly couple) आरडाओरड केला असता नागरिकांनी त्या आरोपीला पकडले. त्यानंतर या आरोपीला आजींसह नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना अमळनेर (Amalner Jalgaon) बसस्थानकावर घडली आहे.
अमळनेर तालुक्यातील वावडे येथील हिम्मत पाटील आपल्या पत्नीसह बाजारात आले होते. त्यावेळी एका इसमाने त्यांच्याजवळ येऊन पेन मागितला. परंतु हिम्मत पाटील यांनी पेन नाही सांगताच आरोपीने डायरी द्या म्हणून जवळ आला आणि त्यांच्या खिशातून साडे तीन हजार रुपये काढून पळ काढला.
वृद्ध दाम्पत्याला लुटणाऱ्याला आजीबाईंनी बदडलं pic.twitter.com/aZcJyEV7FL
— News18Lokmat (@News18lokmat) July 20, 2021
राज कुंद्रा अटकेप्रकरणी कार्यालयातल्या एकाला अटक, पोलिसांची कारवाई
वृद्ध इसमाला त्याच्या पाठीमागे धावता आले नाही मात्र आरोळ्या मारताच नागरिकांनी चोराला बसस्थानकाजवलील डी आर कन्या शाळेजवळ पकडले. हे कळताच हिम्मत पाटील यांची वृद्ध दाम्पत्यही तेथे पोहचले आणि नागरिकांनी काठीने चोराला चांगलाच चोप दिला.
आजीबाईंनी हातात काठी घते या आरोपीला बदडलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. पैसे मिळाल्यामुळे तक्रार न करता त्याला पोलिसांच्या ताब्यात न देता या आरोपीला सोडून देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Jalgaon, Maharashtra, Nashik