नितीन नांदुरकर प्रतिनिधी जळगाव : सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये सोने बाजारात आज सोने खरेदीला ग्राहकांची सुवर्ण पेढ्यांमध्ये मोठी गर्दी झाली आहे. सोन्याच्या दरात 700 रुपयांनी तर चांदीच्या दरात 700 रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचा भाव हा आज 59 हजार 900 तर चांदीचा भाव 70 हजार 300 रुपये प्रति किलो गेला आहे.
गुरुपुष्यामृत योगनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरल्याने सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली. दुसरीकडे दोन हजाराची नोट बंद झाल्यावर ही नोट सराफ बाजारात चालवून याचा उपयोग करून घेताना ग्राहक सोनं खरेदी करत आहेत.
गुरुपुष्यामृत योगमुळे सराफ बाजारात गर्दी, 2 हजाराने स्वस्त झालं सोनं
पाच दिवसांपूर्वी उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात आता जळगावात दोन दिवसांत 2 हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी 70 हजार 300 रुपये प्रति किलोवर दर पोहोचले आहेत. सोन्याच्या भावातही दोन दिवसांत 1 हजार रुपयांची घसरण होऊन ते 59 हजार 9०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून चांदीच्या भावात वाढ होत आहे,तर आज जळगावच्या सुवर्ण नगरीत सोने चांदीची मोठी उलाढाल होणार असून सराफ व्यवसायिकांमध्ये मोठे आनंद पावहावयास मिळत आहे. तर भाव कमि झाल्याने आज पुन्हा ग्राहकांची ही सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.
आता विकता येणार नाहीत जुने दागिने! हॉलमार्किंगचं नियोजन बिघडलं, नवा नियम काय?
2 मे रोजी सोनं 62 हजारावर पोहोचलं होतं. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याचे दर वाढत आहेत. आता पहिल्यांदाच गुरुपुष्यामृत योग आणि त्यापाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशीही सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे आता सोनं खरेदीची लगबग बाजारपेठेत दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today