यामुळे लांबला जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल.. 7 जूनला पुढील सुनावणी

यामुळे लांबला जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल.. 7 जूनला पुढील सुनावणी

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला आहे. जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ या निकाल देणार आहेत. आता निकाल काय लागतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील भविष्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.

  • Share this:

दीपक बोरसे (प्रतिनिधी)

धुळे, 21 मे- काही संशयित आरोपी गैरहजर असल्यामुळे बहुचर्चित 45 कोटींचा जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल लांबणीवर पडला आहे. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 7 जून रोजी होणार आहे.

धुळे जिल्हा कोर्टात मंगळवारी निकाल दिला जाणार होता. परंतु 48 पैकी केवळ पाच संशयित आरोपी कोर्टात हजर होते. गैरहजर संशयितांविरोधात अजमीन पत्र वॉरंट काढण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांनी केली आहे. संशयितांमध्ये सुरेश जैन, गुलाबराव देवकर, प्रदीप रायसोनी, राजा मयूर यांचा समावेश आहे. प्रत्येकाची हजेरी घेतली असता संशयितांच्या चेहऱ्यावर भय स्पष्ट दिसत होते.

49 संशयितांपैकी 1 संशयितांची वेगळी सुनावणी होणार...

धुळे कोर्टात 21 मे रोजी या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला आहे. जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ या निकाल देणार होते. मात्र, काही संशयित आरोपी गैरहजर असल्यामुळे न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जूनला ठेवली आहे.  दरम्यान, 49 संशयितांपैकी एका संशयितांची वेगळी सुनावणी होणार आहे.

आता निकाल काय लागतो? याकडे सर्वांचं लक्ष

आता निकाल काय लागतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील भविष्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. या घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री, माजी आमदार सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक दिग्गजांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा या संशयितांना झाल्यास त्यांना निवडणूक लढता येणार नाही. या घरकुल घोटाळा प्रकरणात 57 संशयितांनी विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आठ संशयितांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित 49 संशयितांच्या भविष्याचा फैसला होणार आहे. 45 कोटींचा अपहार केल्या प्रकरणी घरकुल घोटळ्याचा निकाल येणार आहे.

काय आहे जळगाव घरकुल घोटाळा?

'घरकुल योजना' ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली होती.

मात्र, या योजनेतील सावळागोंधळ सन 2001 मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले. पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे 29 कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

याच काळात पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली गेली. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यावर तीन फेब्रुवारी 2006 रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत 29 कोटी 59 लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली.

या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह खान्देश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी अशा एकूण 90 जणांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन आणि संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळूनही मार्च-एप्रिल 2008 पर्यंत घरकुल गैरव्यवहारातील संशयितांना अटक झाली नव्हती. संशयितांचे राजकीय वजन, त्यांचा दबाव, पोलीस अधिकाऱ्यांची चालढकल, तपासी अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे सहा वर्षे हा तपास रेंगाळला. जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा विषय तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उचलून धरल्यानंतर या प्रकरणातील संशयितांचे अटकसत्र सुरू झाले. सुरेश जैन यांना या प्रकरणी तुरुंगात जावे लागले होते. अधिकृतपणे साडेचार वर्षे कारागृहात असलेले सुरेश जैन यांनी शिक्षेतला बराच काळ आजारपणाच्या नावाखाली आलेशान रुग्णालयात ऐशोआरामात काढला होता.

घाटकोपरमध्ये भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर

First published: May 21, 2019, 11:59 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading