जळगाव हादरलं, पंचायत समितीच्या माजी सभापतीची गळा चिरून हत्या

जळगाव हादरलं, पंचायत समितीच्या माजी सभापतीची गळा चिरून हत्या

डी.ओ. पाटील हे अतिशय मनमिळावू राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व होते. ते मुक्ताईनगर पंचायत समितीला माजी सभापती म्हणून कार्यरत होते.

  • Share this:

इम्तियाज अली, प्रतिनिधी

मुक्ताईनगर, 17 जून : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ. पाटील यांची मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने गळा चिरून तसेच मानेवर वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कुऱ्हा येथील गोसावी पेट्रोलपंपाच्या परिसरामध्ये डी.ओ. पाटील यांची  हत्या करण्यात आली. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आल्यानंतर जवळपास दोन ते तीन हजार नागरिकांचा जमाव या परिसरात जमला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा केला आहे. जळगाव येथून मोठ्या संख्येनं पोलीस कुमक देखील घटनास्थळी हजर झालेली आहे.

चीननं भारताचा कसा केला विश्वासघात? जवानांनी सांगितली गलवान खोऱ्यातली कहाणी

डी.ओ. पाटील हे अतिशय मनमिळावू राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व होते. ते मुक्ताईनगर पंचायत समितीला माजी सभापती म्हणून कार्यरत होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घटनास्थळावर पोलिसांचे हॅप्पी नामक श्वानपथक दाखल झाले. शान पथकाने पेट्रोल पंपासमोर असलेल्या नाल्यापर्यंत माग दाखवला असून पथक थांबून गेले आहे. डी .ओ. पाटील हे शेतीच्या कामानिमित्त रात्री-अपरात्री डिझेल भरण्यासाठी जात असत. र बर्‍याचवेळा याच पेट्रोल पंपावर ते रात्री झोपूनही जात असत.

पाटील यांच्याबद्दल मारेकऱ्यांना याची माहिती असावी व त्यातूनच हा खून  नियोजनबद्ध रित्या केला असावा, अशी माहिती मिळत आहे. मयत पाटील यांच्यासोबत ट्रॅक्टरचालक आणि एक व्यक्ती सोबत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

देश तुमच्यासोबत आहे, पण काही तरी बोला? संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

दरम्यान, सकाळी सहा वाजल्यापासून मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक कैलास भारसके तसेच पोलीस उपनिरीक्षक नीलेश साळुंखे हे घटनास्थळावर हजर झाले. ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. आतापर्यंतची परिस्थिती नियंत्रणात आहे. अद्याप, या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: June 17, 2020, 11:49 AM IST
Tags:

ताज्या बातम्या