लालपरीचं स्टेअरिंग तिच्या हाती, शुभांगी केदार पहिल्या महिली एसटी चालक

लालपरीचं स्टेअरिंग तिच्या हाती, शुभांगी केदार पहिल्या महिली एसटी चालक

अभिमानास्पद! जळगावातील पहिला महिला एसटी चालक होण्याचा पटकावला मान

  • Share this:

जळगाव, 17 फेब्रुवारी: इंग्लिश स्कूलमधील शिक्षकाची नोकरीसोडून पतीच्या पावलावर पाऊल ठेवत पत्नीनंही परिवहन महामंडळात नोकरी स्वीकारली. दुचाकी चारचाकी नाही तर थेट एसटी चालवण्याचं धाडस त्यांनी केलं. कोणतीही भीती न बाळगता शुभांगी केदार यांनी एसचीचं स्टेअरिंग हाती घेतलं आणि चालवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या धाडसाचं जळगावातच नाही तर राज्यभरातून आणि सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.

28 वर्षांच्या शुभांगी केदार या जळगावच्या आहेत. त्या डीएड झाल्या आहे. लग्नाआधी त्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. लग्नानंतर मात्र त्यांनी एसटी महामंडळात नवऱ्यासोबत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. शुभांगी यांच्यासारख्या जवळपास 162 महिला बसवाहक एसटी चालवण्याचं 365 दिवसांचे ट्रेनिंग असल्याचे त्यांनी सांगितले.

शुभांगी यांच्या निर्णयाचं सोशल मीडियावरही युझर्सनी कौतुक केलं आहे. त्यांचा बस चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शुभांगी या कशा पद्धतीनं बस चालवत आहेत हे आपण पाहू शकता. त्यांच्या धाडसाचं आणि जिद्दीचं कौतुक करत या व्हिडिओला दीडशेहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. शुभांगी केदार यांना जळगाव जिल्ह्यातून पहिल्या महिला बस चालक होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

First published: February 17, 2020, 2:30 PM IST

ताज्या बातम्या