मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बाईकच्या भीषण अपघातात बाप-लेकाचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

बाईकच्या भीषण अपघातात बाप-लेकाचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Jalgaon Accident : एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

Jalgaon Accident : एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

Jalgaon Accident : एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

जळगाव, 13 मार्च : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात (Jalgaon Accident) फैजपूर येथील पिता-पूत्रांचा मृत्यू झाला आहे. पिंपरूड फाट्याजवळ हा अपघात झाला. या अपघातानंतर फैजपूर शहरत शोककळा पसरली. गोपाळ जी.पाटील (66) व खेमा गोपाळ पाटील (35, गुरुदत्त कॉलनी, फैजपूर) अशी मयत पिता-पूत्रांची नावे आहेत.

पाटील पिता-पूत्र मूळ गावी चिखली, ता.यावल येथे गेल्यानंतर शनिवारी परतीच्या प्रवासात ते दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.डी.5442) ने फैजपूरकडे येत असताना भुसावळ रस्त्यावरील पिंपरूळ फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गोपाळ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर खेमा पाटील हे गंभीर जखमी झाले.

जखमीस जळगाव येथे हलवलं असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली.

हेही वाचा - महाशिवरात्रीलाच झाला घात; साबुदाणा घशात अडकल्याचं झालं निमित्त अन् 11 वर्षांच्या मुलाने गमावला जीव

याप्रकरणी फैजपूर पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करत आहेत.

दरम्यान, या अपघातात वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Jalgaon, Road accident