मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग

Jalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग

सुरेश दादांच्या कारकिर्दीचा सूर्यास्त जवळ आला अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळत आहे

सुरेश दादांच्या कारकिर्दीचा सूर्यास्त जवळ आला अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळत आहे

सुरेश दादांच्या कारकिर्दीचा सूर्यास्त जवळ आला अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळत आहे

  जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात एकूण नऊ राजकीय पक्ष उतरले होते. मात्र सर्वांवर मात करुन भाजपने महापालिकेवर आपली पकड मजबूत केली. माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात चुरशीची लढत होईल असे वाटले होते. मात्र जळगावमध्ये सुरेश दादांना या निवडणूकीत सपशेल हार पत्करावी लागली. त्यामुळे सुरेश दादांच्या कारकिर्दीचा सूर्यास्त जवळ आला अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने निर्णयात्मक ५७ जागांवर आघाडी घेतली असून सत्तेकडे वाटचाल निश्चित मानली जात आहे. भाजपच्या या विजयामुळे सुरेशदादा जैन यांना मोठा धक्का बसला असून शिवसेनेला १४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अजूनही मतंमोजणी सुरू आहे. प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या जळगावच्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. १९ प्रभागांसाठी ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात होते. या ३०३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे. जळगावच्या नगरपालिकेवर गेल्या ३५ वर्षांपासून सुरेश जैन प्रणित खानदेश विकास आघाडी या गटाचे वर्चस्व होतं, एक हाती सत्ता होती. मात्र यावेळेस खानदेश विकास आघाडीच्या अंतर्गत ही निवडणूक न लढता सुरेश जैन यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हा अंतर्गत घडलेली आहे. भाजप- शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत आहेत तर या निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी या निवडणुकीत बघायला मिळत असली तरी प्रत्यक्षात १० वार्डामध्ये त्यांचे उमेदवार परस्परविरुद्ध मध्ये उभे आहेत, शासनाच्या वतीने मतदारांसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. हेही वाचा-

  Jalgaon Corporation election 2018 : सुरेशदादांना झटका, काँग्रेस-राष्ट्रवादी भुईसपाट

  LIVE : सांगली निवडणुकीत राष्ट्रवादीने उघडलं खातं, चार जागांवर विजयी

  First published:

  Tags: BJP, Girish mahajan, Shivsena, जळगाव महानगरपालिका निवडणूक, भाजप, शिवसेना

  पुढील बातम्या