मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /"खडसे राष्ट्रवादी संपवायला निघालेत, तर एक तरी ग्रामपंचायत शिवसेनेची का नाही?"; पाटील-खडसे पुन्हा भिडले

"खडसे राष्ट्रवादी संपवायला निघालेत, तर एक तरी ग्रामपंचायत शिवसेनेची का नाही?"; पाटील-खडसे पुन्हा भिडले

एकनाथ खडसेंवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे.

एकनाथ खडसेंवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे.

एकनाथ खडसेंवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

जळगाव, 11 डिसेंबर : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. त्यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे तुम्ही राष्ट्रवादी संपवायला निघालात, शरद पवारांनी तुम्हाला दिलेली एमएलसी पण वापस घेतली पाहिजे, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले गुलाबराव पाटील -

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर इथं एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेरीस या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर एकनाथ खडसेंवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे.

एकनाथ खडसे तुम्ही राष्ट्रवादी संपवायला निघालात, शरद पवारांनी तुम्हाला दिलेली एमएलसी पण वापस घेतली पाहिजे. एकनाथ खडसे यांची ताकद कमी करण्यामध्ये त्यांचा स्वतःचा हात आहे. जिल्ह्यातील अर्धी राष्ट्रवादी एकनाथ खडसेंबरोबर नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंना मोठा धक्का, भाजपने मारली बाजी

एकनाथ खडसेंचा पलटवार -

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषेदच्या आमदारकीवरुन एकनाथ खडसेंवर जी टीका केली त्यावरुन एकनाथ खडसेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. गुलाबराव पाटलांनी मला एमएलसी दिलेली नाही, या शब्दात एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांवर पलटवार केला आहे. तसेच एखाद्या चिन्हावर जेव्हा निवडणूक होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने बलाबल समजेल. गुलाबराव पाटील मंत्री असताना एक तरी ग्रामपंचायत शिवसेनेची का नाही, असा सवालही त्यांनी मंत्री गुलाबराव पाटलांना केला.

गुलाबरावांची ताकद कुठे गेली असा टोमणाही त्यांनी मारला. तसेच जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दोन मंत्री, पाच आमदार माझ्याविरोधात उभे आहेत हीच माझी ताकद असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली.

First published:
top videos

    Tags: Eknath khadse, Gulabrao patil, NCP, Shivsena