मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon Dudh Sangh : गिरीष महाजनांना दणका, जळगाव दुध संघातील राज्य सरकारने नियुक्त केलेले प्रशासक मंडळ अवैध

Jalgaon Dudh Sangh : गिरीष महाजनांना दणका, जळगाव दुध संघातील राज्य सरकारने नियुक्त केलेले प्रशासक मंडळ अवैध

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर प्रशासक नेमण्यात आले होते परंतु हे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. (Jalgaon Dudh Sangh)

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर प्रशासक नेमण्यात आले होते परंतु हे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. (Jalgaon Dudh Sangh)

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर प्रशासक नेमण्यात आले होते परंतु हे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. (Jalgaon Dudh Sangh)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

जळगाव, 30 ऑगस्ट : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळावर प्रशासक नेमण्यात आले होते परंतु हे प्रशासक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. (Jalgaon Dudh Sangh) जिल्हा दूध संघाचा वाद हा न्यायालयात पोहोचला होता. दरम्यान आज न्यायालयाने निर्णय दिल्याने एकनाथ खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील वाद न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालय काय निकाल देणार याकडे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने संचालकांच्या बाजूने निर्णय देत राज्य सरकारने नियुक्त केलेले प्रशासक मंडळ अवैध ठरवले असून, ते बरखास्त झाल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.

जळगाव जिल्हा दूध संघातील वाद हायकोर्टात पोहोचला होता. राज्य सरकारने यावर प्रशासक मंडळ बसवून या मंडळाने कारभार हाती घेतला होता. संचालक मंडळाचे अधिकार काढण्यात आले होते तसेच संचालक मंडळाच्या कालावधीतील व्यवहारातील कथित अनियमिततेवरून राज्य सरकारने चौकशीचे आदेश देखील जारी केले होते.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटलांसमोरच तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न, विचारपूसही न करत पाटील गेले निघून!

या संदर्भात मंगळवारी उच्च न्यायालयाने निकाल दिला असून याबाबतची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. ते म्हणाले की, न्यायालयाने संचालक मंडळाचे म्हणणे मान्य करून प्रशासक मंडळ अवैध असून ते बरखास्त करण्यात यावे, असा निकाल दिला असून संचालक मंडळ पूर्ववत कामावर आल्याचे खडसे यांनी सांगितले.

पंकजा मुंडेच्या राष्ट्रवादी ऑफर खडसे म्हणतात

पंकजाताई अस्वस्थ आहेत अशी काही दिवसांपासून चर्चा आहे त्यामुळे त्यांना अमोल मिटकरी यांनी आमंत्रण दिले शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, एवढ्या वर्षापासून पक्षात काम करत आहेत त्या असा निर्णय घेतील वाटत नाही. मागच्या काही दिवसांपूर्वी मंत्रीपद न मिळाल्याने पंकजा मुंडे काही काळ भाजपमध्ये नाराज असल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्यांनी पक्ष सोडीचा निर्णय घेतील का याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

 हे ही वाचा : शहाजीबापू म्हणतात 'महाराष्ट्रात तो विक्रम माझ्या नावावर; उद्धव ठाकरेंना सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन देतो, फक्त..'

50 आमदार फुटतील असे वाटले नव्हते

दरम्यान शिवसेनेतून फुटून भाजपसोबत युती केलेले 50 आमदार फुटतील असे वाटले नव्हते परंतु ते फुटून गेल्याने राज्यातील राजकारणात काहीही घडू शकते असे दिसून येत आहे. दरम्यान भाजपमध्ये निष्ठावंताना अजिबात स्थान नाही ज्यांनी भाजप घडवण्यासाठी आपली हयात घालवली त्यांना भाजपमध्ये स्थान नाही जे नवीन आले आहेत त्यांना चांगली खाती मिळत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच भाजप आणि मनसे युती झाल्यास आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसल्याचे ते म्हणाले.

First published:

Tags: Eknath khadse, Girish mahajan, Jalgaon