मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

NCP Vs Shiv Sena:'त्या' प्रकरणावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद चांगलाच उफाळला

NCP Vs Shiv Sena:'त्या' प्रकरणावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा वाद चांगलाच उफाळला

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  आणि शिवसेनेतील (Shiv Sena) वाद चांगलाच विकोपाला गेला आहे.

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेतील (Shiv Sena) वाद चांगलाच विकोपाला गेला आहे.

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेतील (Shiv Sena) वाद चांगलाच विकोपाला गेला आहे.

जळगाव, 26 डिसेंबर: जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेतील (Shiv Sena) वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. शिवसेना आमदार (Shiv Sena MLA) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) यांनी आपणास चोप देण्याचे वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारीचा विनयभंग केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. रोहिणी खडसेंनी महिलांची छेडखानी करणाऱ्यांना चोपच नाहीतर तर त्यांचे हात तोडून टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच विकोपाला गेला आहे.

हेही वाचा- जालना हादरलं, अपहरण करून दलित तरुणाची हत्या, आत्महत्येचा केला बनाव

जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगर पंचायत निवडणुकीचे मतदान 21 डिसेंबर रोजी पार पडले. मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या अंगावर धावून आल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. त्यानंतर याविरोधात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. तर राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर खोटा आरोप केल्याची तक्रार शिवसेनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

या तक्रारीनंतर मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटस वरून पुन्हा वाद उफळला असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांच्याशी असभ्य वर्तणूक करून विनयभंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत 24 डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेनेच्या वतीने याबाबत परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान शनिवारी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा-  महाराष्ट्रात कधी लागू होणार Lockdown?, राजेश टोपे म्हणाले...

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदारांचे अवैध धंदे बंद करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले होते. त्यानुसार अवैध धंदे बंद होत असल्याने आमदारांनी जाणीवपूर्वक आरोप केल्याचं म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.

First published:

Tags: Eknath khadse, NCP, Shivsena