मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BJP ला मोठा धक्का, उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं 'या' निवडणुकीत एकनाथ खडसेंची बिनविरोध निवड निश्चित

BJP ला मोठा धक्का, उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं 'या' निवडणुकीत एकनाथ खडसेंची बिनविरोध निवड निश्चित

उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यानंतर भाजपच्या उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यानंतर भाजपच्या उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यानंतर भाजपच्या उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

  • Published by:  Pooja Vichare

जळगाव, 29 ऑक्टोबर: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank Elections) भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत छाननीअंती बाद झालेल्या भाजप उमेदवारांच्या (BJP candidates) हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावल्यात. विभागीय आयुक्तांनी माजी आमदार स्मिता वाघ (former MLA Smita Wagh) , मुक्ताईनगर येथील नाना पाटील (Nana Patil) , माधुरी अत्तरदे या तिघांसह अन्य चार जणांच्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननी प्रक्रियेत भाजपच्या स्मिता वाघ, नाना पाटील, माधुरी अत्तरदे, भारती चौधरी यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अवैध ठरवण्यात आले होते.

हेही वाचा- आर्यनला जामीन मिळताच नवाब मलिकांची हटके प्रतिक्रिया, फिल्मी स्टाईल Tweet

उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्यानंतर भाजपच्या उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. मंगळवारी यावर कामकाज देखील झालं होतं. त्यानंतर गुरुवारी विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला. या निर्णयात भाजपच्या उमेदवारांना मोठा झटका बसला आहे.

स्मिता वाघ यांचा अर्ज बाद झाला. अमळनेर येथे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील तर मुक्ताईनगर मधून नाना पाटील यांचा अर्ज बाद झाल्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची निवड बिनविरोध झाल्याचं निश्चित झालं.

हेही वाचा- धनत्रयोदशीच्या आधीच शुक्राचं राशी परिवर्तन; या 5 राशींसाठी ठरणार लाभदायक 

यावर भाजपचे अरविंद देशमुख यांनी विभागीय आयुक्तांवर सत्तेचा गैरवापर करुन दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे.

First published:

Tags: BJP, Eknath khadse, Jalgaon