जळगाव, 03 ऑगस्ट: गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या माजी प्रभारी नगराध्यक्षांसह डान्स करणं जळगावमधील पोलिसांना अडचणीत आणणारं ठरू शकतं. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष आणि प्रहार संघटनेचे विभागीय अध्यक्ष यांच्या सोबत डान्स केल्या प्रकरणी पाच पोलीस कर्मचारी चांगलेच अडचणीत आले असून चौकशीअंती दोषी आढल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत आता पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
पोलीस दलातील जळगाव शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक वासुदेव सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शहरातीलच एका हॉलमध्ये काल आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्यांच्या सह भुसावळ चे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनाही निमंत्रित करण्यात आले होते
या कार्यक्रम प्रसंगी 'में हू डॉन' आणि 'ओ शेठ..' या गाण्यावर शहर पोलीस ठाण्यातील पाच कर्मचारी आणि अनिल चौधरी यांनी ठेका धरला होता. ही क्लिप सोशल मीडियावर वायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. अनिल चौधरी यांच्यावर खंडणी सह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेली अनिल चौधरी यांच्या सोबत पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला डान्स पाहता पोलीस दलातील काही कर्मचारी आणि गुन्हेगार यांच्यातील नाते किती घनिष्ट आहे अशी चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची नाचक्की होत असल्याने या घटनेत अनिल चौधरी यांच्या सोबत डान्स करणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान या पोलिसांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेत दोषी आढळून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalgaon