जळगावात सायबर टोळीचा पर्दाफाश; 412 कोटींच्या चोरीचा प्रयत्न फसला, पत्रकाराला अटक

जळगावात सायबर टोळीचा पर्दाफाश; 412 कोटींच्या चोरीचा प्रयत्न फसला, पत्रकाराला अटक

सुमारे 412 कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीच्या प्रयत्न जळगाव पोलिसांनी हाणून पाडला.

  • Share this:

जळगाव, 17 ऑक्टोबर: देशभरातील विविध ठिकाणच्या खातेदारांचा एटीएम कार्डसह बँक खात्याशी संबंधित डाटा मिळवून त्या माध्यमातून 412 कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीच्या प्रयत्न जळगाव पोलिसांनी हाणून पाडला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या विशेष निरीक्षणात रामानंद गनर पोलिसांनी इथिकल हॅकर मनीष भंगाळे याच्या मदतीनं अत्यंत अभ्यासपूर्ण तपास व चौकशी करुन सापळा रचून सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे.

या टोळीतील मुख्य संशयित हेमंत ईश्‍वरलाल पाटील (वय- 42, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर) व बांधकाम ठेकेदार मोहसीन खान ईस्माईल खान (वय-35, रा.देवपूर, धुळे) या दोन्ही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. आणखी देशभरातील विविध ठिकाणच्या सात संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधार्थ चार पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.

हेही वाचा...सिंचन घोटाळा प्रकरणी ईडीचे पत्र; अजित पवार, तटकरेंच्या अडचणी वाढणार?

संशयितांकडून मिळालेल्या विविध बँक खातेदारांच्या डाटाचा रक्कमेचा विचार केला तरी अब्जावधीची रक्कम पोलिसांच्या सतर्कतेमुळे व वेळीच अभ्यासपूर्ण तपासामुळे चोरी होण्यापासून सुरक्षित राहिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून बँकेचा डाटा खरच सुरक्षित आहे का? असाही प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देशभरातील बिल्डर, उद्योगपती, राजकारणी, बड्या आसामींचे कोट्यवधी रुपये असलेल्या बँक खात्यांचे डिटेल्स चोरी झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या टोळीमधील आतापर्यंत नऊ संशयित पोलिसांना निष्पन्न झाले असून ते खान्देशासह इतर राज्यातील हेत. या टोळीमध्ये बँक अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे.

आधी केलं फक्त 250 रुपयांचं ट्रान्झॅक्शन...

मनीष भंगाळे यानं माहिती पाठवलेल्या एका खात्यातून संशयित पाटील व खान यांच्या खात्यात 250 रुपयांप्रमाणे ट्रान्झॅक्शन केले. त्यामुळे 412 कोटी रुपयांचेही असेच ट्रान्झॅक्शन होईल, याची खात्री संशयितांना पटली. त्यानंतर भंगाळेच्या माध्यमातून पोलिसांनी पाटील व खान याला जळगाव शहरातील एकलव्य मैदानाजवळून बोलवले.

हेही वाचा..या सरकारी कंपनीची मोठी घोषणा,दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार 68500 रुपये

पोलिस दबा धरून बसलेले होते. तेथे येताच पोलिसांनी पत्रकार पाटील व बिल्डर खान याला अटक केली. त्यांच्याकडून मोबाइल, आरसीबूक, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तपासासाठी पोलिसांनी भंगाळे याचाही मोबाइल जप्त केला आहे. शुक्रवारी पोलिसांनी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले. त्यांना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Published by: Sandip Parolekar
First published: October 17, 2020, 12:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या