मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon Crime : जळगावात धक्कादायक प्रकार समोर जुन्या वादातून दोन वर्षांच्या मुलीला अमानूष मारहाण

Jalgaon Crime : जळगावात धक्कादायक प्रकार समोर जुन्या वादातून दोन वर्षांच्या मुलीला अमानूष मारहाण

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे लहान मुलीला मारल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे.

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे लहान मुलीला मारल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे.

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे लहान मुलीला मारल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे.

  नितीन नांदूरकर (जळगाव) 02 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे लहान मुलीला मारल्याची घटना समोर आली आहे. दोन वर्षाच्या मुलीच्या आईसोबत शेजारील महिलेचा वाद होता. ती मुलगी दारात खेळण्यासाठी आल्याने जुन्या वादाचा त्या मुलीवर राग काढत अमानूष मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये ती चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime)

  पाचोरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शेजारील महिलेने अमानुष दोन वर्षांच्या लहान मुलीला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सदर घटना दुसऱ्या दिवशी समोर आल्यानंतर संबंधित महिले विरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवानी मोहित बडगुजर असे मारहाण झालेल्या मुलीचे नाव आहे.

  हे ही वाचा : पनवेलमध्ये मनसेला मोठे खिंडार, माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांचा शिंदे गटात प्रवेश

  शिवानीच्या शरीरावरील जखमा पाहून तिला अमानुषपणे मारहाण झाल्याची मुलीच्या आईच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती शेजारी विचारले असता संबंधीत महिलेने उडवा उडवीची उत्तरे दिली. या निर्दयी शेजारीण बाईने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीला जमिनीवर लोळाऊन चपलीने व काठीने बेदम मारहाण केली असल्याचे काहींनी चिमुकलीच्या घरी समजल्यावर याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

  दरम्यान त्या मुलीला मारताना मुलगी कळवळत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा तीव्र निषेध पिंपळगाव हरे येथील जनतेतून होत आहे. सदर महिलेचे मुलीच्या आईसोबत जुने वाद होते असे सांगितले जात आहे. त्याच जुन्या वादाचा राग मनात ठेवून अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकली बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.

  हे ही वाचा : Maharashtra Rain : पुन्हा मुंबईची तुंबई तर राज्य पाण्यात जाण्याची भीती, हवामान विभागाचा अंतिम अहवाल सादर

  या महिलेने निर्दयीपणे निष्पाप मुलीला मारहाण केली असून ही मुलगी तिथे जागेवर ओक्साबोक्शी रडतानाही चप्पलने व काठीने मारहाण केली. याप्रकरणी पिंपळगाव हरे पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Crime, Crime news, Jalgaon, Police

  पुढील बातम्या