Home /News /maharashtra /

Jalgaon: 10 महिन्यांपूर्वी वडिलांचं निधन, आता काकानं केला आईचा खून; 8 वर्षाचा चिमुरडा झाला अनाथ

Jalgaon: 10 महिन्यांपूर्वी वडिलांचं निधन, आता काकानं केला आईचा खून; 8 वर्षाचा चिमुरडा झाला अनाथ

Jalgaon murder news एका 8 वर्षाच्या चिमुरड्यावर या घटेनेचा गंभीर परिणाम होणार आहे. मृत महिलेला एक 8 वर्षांचा मुलगा होता आणि महिला विधवा असल्यानं आता या मुलाला अनाथाप्रमाणं जीवन जगावं लागणार आहे.

    जळगाव, 22 मे : रागाच्या भरात केलेल्या एखाद्या कृत्यामुळं एकाचवेळी किती जणांचं आयुष्य उध्वस्त होऊ शकतं, हे जळगावातील (Jalgaon) एक घटनेवरून समोर आलं आहे. जळगावात एका तरुणानं त्याच्या वहिनीची निर्घृणपणे हत्या (Man killed sister in law) केली आहे. या हत्येनंतर त्याच्या वहिनीचं जीवन तर संपलंच पण त्याचबरोबर त्याची रवानगी तुरुगांत होण्याची शक्यता आहे. पण याशिवाय एका 8 वर्षाच्या चिमुरड्यावर या घटेनेचा गंभीर परिणाम होणार आहे. मृत महिलेला एक 8 वर्षांचा मुलगा होता आणि महिला विधवा असल्यानं आता या मुलाला अनाथाप्रमाणं जीवन जगावं लागणार आहे. (Jalgaon crime news) जळगावाच्या पिंप्राळा परिसरात असलेल्या मयूर कॉलनीतील ही घटना आहे. याठिकाणी योगिता मुकेश सोनार ही विधवा महिला तिच्या आठ वर्षांच्या मुलाबरोबर राहत होती. या महिलेचे तिचा दीर आणि या घटनेतील आरोपी दीपक सोनार हिच्याशी गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. कौटुंबिक कारणावरून सुरू असलेले हे वाद दिवसेंदिवस वाढत चालले होते. दोन दिवसांपूर्वीदेखिल त्यांच्यात पुन्हा एकदा असाच वाद झाला. पण यावेळी झालेल्या वादामुळं दीर दीपक हा प्रचंड रागात होता. या रागाच्या भरात त्यानं वहिणी योगिता हिचा खून केला. डोक्यात कुऱ्हाडीने वार करत अत्यंत निर्घृणपणे दीपकने तिची हत्या केली. (हे वाचा-'माझ्या पार्थिवाला पत्नीनं अग्नी द्यावा', तरुणानं व्यक्त केली शेवटची इच्छा आणि..) मृत योगिता सोनार या शहरातील मयूर कॉलनीत त्यांच्या कुटुंबीयांसह राहत होत्या. त्यांचे पती मुकेश सोनार यांचं जवळपास 10 महिन्यांपूर्वी अपघातात निधन झालं झालं होतं. तसंच त्यानंतर काही दिवसांतच त्यांचे सासरे लोटन सोनार यांचंही निधन झालं होतं. त्यानंतर योगिता आणि त्यांचा दीर दीपक यांच्यात वारंवार वाद होत होते. याच वादातून शुक्रवारी योगिता यांची दीपकनं हत्या केली. (हे वाचा-झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता अल्पवयीन मुलगा-मुलीचा मृतदेह; घातपाताचा संशय) दीपकने केलेल्या हल्ल्यात योगिता यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना 8 वर्षांचा एक मुलगा आहे. या सर्व प्रकारामध्ये या मुलावर मात्र अत्यंत वाईट वेळ आली आहे. 10 महिन्यांपूर्वी वडील गमावलेल्या या चिमुरड्याला आता आयुष्यात परत कधीही आईची मायाही मिळणार नाही. कदाचित कुटुंबीय त्याचा सांभाळ करतीलही, पण आई वडिलांचं छत्र आता कायमचं त्याच्या डोक्यावरून निघून गेलं आहे. कौटुंबीक वाद आणि संतापातून झालेल्या या घटनेमुळं हा चिमुरडा मात्र आता आयुष्यभरासाठी अनाथ झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon, Murder

    पुढील बातम्या