मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रक्षाबंधनाच्याआधी बहिणीला मिळाला न्याय, छेड काढणाऱ्या नराधम भावाला कोर्टाने सुनावली शिक्षा

रक्षाबंधनाच्याआधी बहिणीला मिळाला न्याय, छेड काढणाऱ्या नराधम भावाला कोर्टाने सुनावली शिक्षा

दारूच्या नशेत सख्ख्या बहिणीचा विनयभंग या नराधम भावाने केला होता. अखेर दोनच महिन्यात...

दारूच्या नशेत सख्ख्या बहिणीचा विनयभंग या नराधम भावाने केला होता. अखेर दोनच महिन्यात...

दारूच्या नशेत सख्ख्या बहिणीचा विनयभंग या नराधम भावाने केला होता. अखेर दोनच महिन्यात...

  • Published by:  sachin Salve
इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 07 ऑगस्ट : भाऊ आणि बहिणीच्या नात्याची विण घट्ट करणारा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण, भावाच्या रुपात दानव असलेल्या नराधमाला कोर्टाने चांगलाच धडा शिकवला आहे. सख्ख्या बहिणीचा विनयभंग करणाऱ्या भावाला 3 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. दोन महिने बारा दिवसात जामनेर न्यायालयाने निकाल देत शिक्षा सुनावली आहे. जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटनेनं अवघ्या महाराष्ट्र सुन्न झाला होता. दारूच्या नशेत सख्ख्या बहिणीचा विनयभंग करणाऱ्या नराधम भावास जामनेर न्यायालयाने अखेर शिक्षा सुनावली. जामनेर तालुक्यातील एका गावात 28 मार्च 2022 रोजी दारूच्या नशेत गाढ झोपेत असलेल्या बहिणीचा विनयभंग केल्याचा संताप जनक प्रकार घडला होता. पीडित बहिणीने आरडाओरडा केल्याने आईने नशेत असलेल्या नराधम भावाच्या तावडीतून सोडवले. मात्र इच्छेप्रमाणे मला करू न दिल्याच्या कारणावरून नराधमाने बहिणीसह आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. (न्यू नागपाडा वार्डात मागच्या वेळी सपाची बाजी; यावेळी निकाल काय लागणार?) त्यामुळे पीडितेने थेट जामनेर पोलीस स्टेशन गाठून आपल्या नराधम भावाविषयी तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता व तिच्या आईची साक्ष ही महत्वपूर्ण ठरली. दरम्यान जामनेर न्यायालयाने या खटल्यावर अतिशय शीघ्र गतीने कामकाज करत २ महिने बारा दिवसात निकाल देत आरोपी भावास तीन वर्षसक्त मजुरीची व दहा हजार रुपये दंड ही शिक्षा सुनावली आहे.
First published:

पुढील बातम्या