मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon Election 2018: गुरू सुरेशदादांवर भारी पडला शिष्य

Jalgaon Election 2018: गुरू सुरेशदादांवर भारी पडला शिष्य

जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत

जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत

जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत

जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत खडसेंना बाजूला ठेऊन महाजनांनी भाजपचं जळगावात कमळ फुलवून दाखवलंय. जळगाव महापालिकेची सत्ता काबिज करताना महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलीच धोबीपछाड केलंय. या निकालामुळे जळगावातील सुरेश जैनांचं राजकीय साम्राज्य एकाच दणक्यात खालसा झालंय. या निवडणुकीत सुरेश जैनांनी प्रथमच आघाडीशी मोडतं घेत शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुक लढली होती. तरीही त्याचा त्यांना काहीच राजकीय फायदा झाला नाही. बरेच दिवस तुरुंगात राहिल्याने त्यांना जळगावकरांची सहानुभूती मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण झालं उलटचं, गिरीश महाजनांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन प्रथमच महापालिकेची सत्ता काबीज केल्याच जमा आहे. या निवडणुकीत खडसेंना महाजनांनी एकटं पाडण्यासाठी 'ती' ऑडिओ क्लीप आपली नसल्याचेच सांगून मोठी खळबळ उडवून दिली होती. तरीपण त्याचा भाजपच्या मतदानावर काहीच परिणाम दिसून आला नाही. दरम्यान, प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या जळगावच्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. १९ प्रभागांसाठी ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात होते. या ३०३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे. जळगावच्या नगरपालिकेवर गेल्या ३५ वर्षांपासून सुरेश जैन प्रणित खानदेश विकास आघाडी या गटाचे वर्चस्व होतं, एक हाती सत्ता होती. मात्र यावेळेस खानदेश विकास आघाडीच्या अंतर्गत ही निवडणूक न लढता सुरेश जैन यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हा अंतर्गत घडलेली आहे. भाजप- शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत आहेत तर या निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी या निवडणुकीत बघायला मिळत असली तरी प्रत्यक्षात १० वार्डामध्ये त्यांचे उमेदवार परस्परविरुद्ध मध्ये उभे आहेत, शासनाच्या वतीने मतदारांसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. हेही वाचा-

Jalgaon Corporation election 2018 : सुरेशदादांना झटका, काँग्रेस-राष्ट्रवादी भुईसपाट

LIVE : सांगली निवडणुकीत राष्ट्रवादीने उघडलं खातं, चार जागांवर विजयी

First published:

Tags: BJP, Election 2018, Girish mahajan, Jalgaon corporation election 2018, Shivsena, Sureshdada jain, गिरीश महाजन, जळगाव महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका निवडणूक, भाजप, शिवसेना, सुरेश जैन

पुढील बातम्या