मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ

Jalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ

भाजपच्या लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाला. काँग्रेस राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही.

भाजपच्या लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाला. काँग्रेस राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही.

भाजपच्या लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाला. काँग्रेस राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही.

    जळगाव, 03 आॅगस्ट : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता राखली आहे. भाजपने निर्विवाद आघाडी घेतली. मात्र,भाजपच्या लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुफडा साफ झाला. काँग्रेस राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी 75 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपने सर्वाधिक 57 जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल सुरू केलीय. मात्र, मागील निवडणुकीत चौथ्या स्थानावर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रचार सभा घेतली होती. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांने प्रचाराकडे पाठ फिरवली होती. याचाच फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने 11 जागा जिंकल्या होत्या. त्याआधी त्यांना भोपळा फोडावा लागला होता. आता पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाट्याला अपयश आलंय. राज्यात झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीतही काँग्रेस राष्ट्रवादीला धक्के खावे लागले होते. प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या जळगावच्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. १९ प्रभागांसाठी ७५ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात होते. या ३०३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे. जळगावच्या नगरपालिकेवर गेल्या ३५ वर्षांपासून सुरेश जैन प्रणित खानदेश विकास आघाडी या गटाचे वर्चस्व होतं, एक हाती सत्ता होती. मात्र यावेळेस खानदेश विकास आघाडीच्या अंतर्गत ही निवडणूक न लढता सुरेश जैन यांनी ही निवडणूक शिवसेनेच्या चिन्हा अंतर्गत घडलेली आहे. भाजप-शिवसेना स्वबळावर निवडणूक लढत आहेत तर या निवडणुकीमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी या निवडणुकीत बघायला मिळत असली तरी प्रत्यक्षात १० वार्डामध्ये त्यांचे उमेदवार परस्परविरुद्ध मध्ये उभे होते. तसंच शासनाच्या वतीने मतदारांसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून येतंय. हेही वाचा Jalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग Jalgaon Corporation election 2018 : जळगावात 'कमळ' उमललं, सुरेशदादांना धक्का

    LIVE : सांगली निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी

    First published:

    Tags: Congress, NCP

    पुढील बातम्या