कोरोनाचा कहर थांबता थांबेना! देशाच्या तुलनेत जळगावात चौपट मृत्यूदर

कोरोनाचा कहर थांबता थांबेना! देशाच्या तुलनेत जळगावात चौपट मृत्यूदर

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा गुणाकार सुरु झाला असून समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे.

  • Share this:

जळगाव, 30 मे: देशासह राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवल वाढतच चालला आहे. राज्यात मुंबईसह पुणेपाठोपाठ आता ग्रामीण भागात कोरोनानं पाय पसरवले आहेत.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा गुणाकार सुरु झाला असून समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. धक्कादायक म्हणजे देशाच्या तुलनेत जळगावचा कोरोना मृत्यूदर चौपट आहे. देशात कोरोना बळींचा मृत्यूदर 2.87 टक्के आहे. तर जळगावात कोरोना बळींचा मृत्यूदर हा सर्वाधिक 11.49 टक्के आहे. त्यामुळे जळगावकरांची चिंता आणखी वाढली आहे.

हेही वाचा.. मोठी बातमी! देशात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, सरकारकडून नवी गाईडलाईन जाहीर

जळगाव जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टनुसार नव्या 55 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. एकूण कोरोना रूग्ण संख्या 676 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 73 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शनिवारी भुसावळ येथे 14, भडगाव 5, जळगाव ग्रामीण 2, चोपडा 5, एरंडोल 3, अमळनेर 11, यावल 4, रावेर 8 आणि जामनेर 1 अशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आली आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातही कोरोनाने हाहाकार उडाला आहे. धुळे जिल्ह्यात शनिवारी 19 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 19 पैकी 14 रुग्ण शिरपूर शहरात सापडले आहेत. त्यामुळे शिरपूर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट म्हणून समोर आला आहे. तर 5 रुग्ण हे धुळे शहरात सापडले आहेत.

हेही वाचा.. 'तो' निर्णय विद्यार्थ्यांवर अन्यायकारक! हिना गावितांची राज्य सरकारवर सडकून टीका

धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 156 वर पोहोचली आहे. धुळ्यातही कोरोनाचा मृत्यूदर जास्त आहे. आतापर्यंत 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यत 67 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

First published: May 30, 2020, 8:40 PM IST

ताज्या बातम्या