Home /News /maharashtra /

गुन्ह्यांचा शोध लावणाऱ्या तरुण पोलिसानेच केली आत्महत्या, घरात लावला गळफास

गुन्ह्यांचा शोध लावणाऱ्या तरुण पोलिसानेच केली आत्महत्या, घरात लावला गळफास

जळगावमधील चोपडामध्ये कौटुंबिक तणावातून एका तरुण पोलिसाने आत्महत्या केली आहे.

    चोपडा ( जळगाव ), 21 फेब्रुवारी : पोलीस म्हटलं सगळ्यांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्ह्यांचा छडा लावणारे असतात. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा ठेवण्यापासून ते एखाद्या क्राईम ठिकाणी गुन्ह्याचा छडा लावण्यापर्यंत पोलीस काम करतात. पण असंच गुन्ह्याचा शोध लावणाऱ्या पोलिसानेच गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. पोलीस सामान्य नागरिकांच रक्षण करतात. नागरिकांची सुरक्षा करणं ही पोलिसांची जबाबदारी असते. मात्र या पोलिसांचं आयुष्यही तितक्याच तणावांनी भरलेलं असतं. नागरिकांना तणावातून दूर करत असताना पोलिसांच्या खाजगी आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. मात्र पोलीस आपलं कर्तव्य बजावत त्या सर्व अडचणी बाजूला ठेऊन आपल्या कामाप्रती एकनिष्ठ राहतात. मात्र कधी कधी आयुष्यातील हा तणाव पोलिसांच्या जीवावर बेततो. हेही वाचा- गंमत कराल तर जंमतच करून टाकेल, अजितदादांनी उपटले कार्यकर्त्यांचे कान, VIDEO जळगाव जिल्ह्यातील चोपडामध्ये याच तणावातून एका तरुण पोलिसाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पंकज मोहन पाटील असं या पोलिसाचं नाव आहे. 27 वर्षीय पंकज चोपडा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शहरातील रिद्धीसिध्दी कॉलनीमध्ये ते भाड्याच्या घरात राहत होते. कौटुंबिक कारणावरून त्यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पंकज पाटील यांची कौटुंबिक स्थिती फारशी चांगली नव्हती.घरात सतत वाद होत असत. आणि भांडणामुळे पंकज पाटील यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. याच नैराश्यातून त्यांनी आपलं आयुष्य संपवल्याचं कळत आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. हेही वाचा- सरकारचा मोठा निर्णय, भरतीसाठी महापोर्टल बंद करून नव्या संस्थेची निवड करणार मानसिक तणावातून पोलिसांच्या होत असलेल्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कामचे अधिकचे तास, कामाचं टेन्शन याने पोलिसांना मानसिक आणि शारीरिकही त्रास होतो. या कामासोबतच कौटुंबिक अडचणींचा सामना करताना बऱ्याचदा असे टोकाचे निर्णय घेतले जातात. हेही वाचा- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना 'युपीएससी'च्या प्रशिक्षणासोबत विद्यावेतनही मिळणार
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Police, Police death, Suicide

    पुढील बातम्या