मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /4 वर्षीय चिमुरडीवर 26 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, रक्तानं माखलेले कपडे दिसल्यानं उघड झाला प्रकार

4 वर्षीय चिमुरडीवर 26 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, रक्तानं माखलेले कपडे दिसल्यानं उघड झाला प्रकार

चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं जळगावच्या चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे.

चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं जळगावच्या चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे.

चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं जळगावच्या चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे.

जळगाव, 28 नोव्हेंबर: जळगाव (Jalgaon district) जिल्ह्यातल्या चाळीसगावातून अत्याचाराची एक बातमी समोर आली आहे. चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं जळगावच्या चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे. वाईट कृत्य करणाऱ्या नराधमास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा नातलग असल्याचं समजतंय. गेल्या आठवड्यातच एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्यानंपंचक्रोशीतुन संतापाची लाट उमटू लागली आहे.

नराधम पीडित मुलीच्या नात्यातला आहे. सावळाराम शिंदे असं आरोपीचं नाव आहे. तो केवळ 26 वर्षांचा आहे. आरोपीनं खाऊ घेऊन देण्याचं आमिष दाखवून चिमुरडीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलीला तिच्या आईजवळ आणून सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून मातेला शंका आली. त्यानंतर मातेनं आरडाओरड केली.

हेही वाचा- सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार

आरोपी सावळाराम भानुदास शिंदे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी पीडित चिमुरडीवर अत्याचार झाल्याचं सांगत तिला इजा झाल्याचं सांगितलं. त्यामुळे तिला पुढील उपचार करण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा- IND vs NZ: तयारीसाठी मिळाले फक्त 12 मिनिटे! टीम इंडियाच्या खेळाडूनं सांगितला 'तो'अनुभव VIDEO

माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून आरोपीला कठोर शासन व्हावं अशी मागणी सामजिक कार्यकर्त्या दक्षता समिती सदस्य सोनाली लोखंडे यांनी केली.

First published:
top videos

    Tags: Jalgaon, Rape