जळगाव, 01 जून : जळगाव नागपूर महामार्गालगत खाजगी पार्किंगच्या जागेत लावलेल्या प्रसन्न यात्रा कंपनीच्या तीन लक्झरी बसेस जळून खाक झाल्या आहेत.
याच परिसरातूनच वरून गेलेल्या हायटेन्शनची वायर तुटून हा अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे. जळगावपासून विविध यात्रा पूर्ण करून परत आलेल्या लक्झरी गाड्या या परिसरात पार्क केल्या जातात.
आज दुपारी 1 वाजता अचानक हायटेन्शन वीज तार कोसळल्याने इथे पार्क केलेल्या तीन बसेसने पेट घेतला. याचा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. यात या तीनही बसेस जळून खाक झाल्या आहेत.
घटनेची खबर मिळताच जळगाव मनपा अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पण तोपर्यंत तीनही बसेस जाळून खाक झाल्या.
सुदैवाने घटनास्थळी कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही. पण गाड्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video