मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BJP आमदाराच्या बॅनरवर झळकला एकनाथ खडसेंचा फोटो तर भाजप नेते गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

BJP आमदाराच्या बॅनरवर झळकला एकनाथ खडसेंचा फोटो तर भाजप नेते गायब, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

BJP leaders photo missing from mla Sanjay Savkare banner: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या बॅनरवरुन भाजप नेत्यांचेच फोटो गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

BJP leaders photo missing from mla Sanjay Savkare banner: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या बॅनरवरुन भाजप नेत्यांचेच फोटो गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

BJP leaders photo missing from mla Sanjay Savkare banner: भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या बॅनरवरुन भाजप नेत्यांचेच फोटो गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

जळगाव, 11 डिसेंबर : भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या बॅनरवर (BJP MLA banner) भाजप नेत्यांच्या फोटोऐवजी चक्क राष्ट्रवादीच्या नेत्याचा फोटो झळकला (NCP leader photo on BJP MLA Banner) आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे (BJP MLA Sanjay Savkare) यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे टांचा फोटो दिसत आहे. भाजप आमदाराच्या बॅनरवर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (NCP Leader Eknath Khadse photo on BJP MLA Sanjay Savkare Banner in Jalgaon) जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेचे भाजपा आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवरून भाजपचे नेते गायब झाल्याचे दिसून येत असून बॅनरवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा फोटो पहायला मिळत आहे. हे बॅनर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याने राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. वाचा : मुंबईत सभा-मोर्चाला परवानगी नाही; 'मुंबई आमची कुणीही थांबवू शकत नाही' म्हणत MIM रॅलीवर ठाम भाजपचे आमदार संजय सावकारे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्याने सावकारे काहीसे एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर आता भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब झाल्याने खडसेंच्या पाठोपाठ सावकारे ही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 2024 ला सुद्धा हेच सरकार येणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक मोठं विधान केलं आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) खाजगीत केलेल्या एका चर्चेबाबत जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी आघाडी सरकारबाबत विधान केलं आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "2024 ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील. तसं पहायला गेलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फारसं अंतर नाहीये. पुण्यात शरद पवरांनी आपल्या मित्रांसोबत बोलताना सांगितलं... एक खाजगीतलं सांगतोय, शरद पवार म्हणाले, 2024 ला सुद्धा हेच सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील." वाचा : 'सरकारी मेहमान घर आने वाले है' नवाब मलिकांचं खळबळजनक ट्वीट भाजपला मोठं खिंडार पडणार, भाजपमध्ये गेलेल्यांची लवकरच घरवापसी होणार काही दिवसांपूर्वी नवाब मलिक म्हणाले होते, सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, देवेंद्रजी वारंवार भविष्यवाणी करण्यात येत आहे. चंद्रकातं पाटील स्वप्न पाहून उठत राहिले. आता नारायण राणे... 1999 मध्ये मुख्यमंत्रिपद गेलं आणि त्या पदासाठीच ते काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर भाजपत आले. त्यानंतर ते प्रत्येक वर्षी नवस करत आहेत. बोकड, कोंबड्या कापण्याचा प्रकार ते करत आहेत परंतु अजूनही नवस पूर्ण झालेला नाही. त्यांनी लक्षात घ्यावं ही सरकार दिवसेंदिवस भक्कम होत चाललेले आहे असंही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक पुढे म्हणाले, त्यांना हे ही सांगतो लवकरच भाजपमध्ये असणारे अनेक आमदार आता पुन्हा स्वगृही परतणार आहेत. भाजप हताश आहे. एनसीपी, काँग्रेसमधून भाजपमध्ये जे गेले होते ते आता घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस, एनसीपीतून भाजपमध्ये गेलेल्यांना रोखण्यासाठी सरकार पडणार असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत.
First published:

Tags: BJP, Eknath khadse, Jalgaon, NCP

पुढील बातम्या