Home /News /maharashtra /

9 दिवसांत उद्ध्वस्त झालं कुटुंब; आईचा कोरोनाने मृत्यू, आजीचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात

9 दिवसांत उद्ध्वस्त झालं कुटुंब; आईचा कोरोनाने मृत्यू, आजीचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात

डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व वॉर्ड बॉय विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव, 11 जून : कोरोनाच्या संकटकाळात जळगावमधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली. कोरोनाचा धुमाकूळ आणि रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार यामुळे एक कुटुंब अवघ्या 9 दिवसांमध्ये उद्धवस्त झालं आहे. हर्षल नेहेते यांना आपली आणि आजी तर गमवावी लागलीच, पण त्याचवेळी आपल्या व्यवस्थेचा संताप आणणारा गलथानपणा समोर आला आहे. कामानिमित्त पुण्यात राहणाऱ्या हर्षल नेहेते यांची आई आणि आजीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर 6 तास वाट पाहूनही आयसीयू बेड न मिळाल्याने 60 वर्षीय आईचा मृत्यू झाला, तर 82 वर्षीय आजीनेही रुग्णालयातच जीव गमावला. मात्र मृत्यू झाल्यानंतर अनेक दिवस आजीचा मृतदेह रुग्णालयातून शौचालयात पडून होता. याबाबत 'इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाने वृत्त दिलं आहे. जळगाव जिल्हा कोविड रुग्णालयातून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचा मृतदेह जिल्हा कोविड रुग्णालयातच स्वच्छतागृहात आढळून आल्याने रुग्णालयातील वार्ड क्रमांक सात मधील डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी व वॉर्ड बॉय विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 जून पासून 82 वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्ध महिला कोरोना वॉर्डमधून बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र सदर वृद्ध महिलेचा मृतदेहा हा 8 दिवसानंतर कोव्हिड रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये आढळून आल्याने रुग्णालय प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला. विशेष म्हणजे टॉयलेटमधून दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार उघडकीस आल्याने रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 7 च्या डॉक्टर परिचारिकांसहित सर्व कर्मचाऱ्यांवर या घटनेचा ठपका ठेवत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या