मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बाप रे! एकाच वेळी शेतात आढळले 6 भलेमोठे अजगर, शेतकऱ्यांमध्ये भीती

बाप रे! एकाच वेळी शेतात आढळले 6 भलेमोठे अजगर, शेतकऱ्यांमध्ये भीती

चोपड़ा तालुक्यात गेल्या आठ दिवसांमध्ये वेगवेगळ्या शेतांमध्ये तब्बल 12 ते 13 भले मोठ-मोठे अजगर आढळले.

    जळगाव, 13 मार्च : जळगाव जिल्ह्यातील चोपड़ा शिवारात अनंत मोतीलाल चौधरी(बस वाहक)यांच्या शेतात एकाच ठिकाणी 6 अजगर आढळले आहेत. तसंच खेड़ी भोकरी शिवारात वासुदेव पाटील यांच्याही शेतात 2 अजगर आढळले. या प्रकरामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपड़ा तालुक्यात गेल्या आठ दिवसांमध्ये वेगवेगळ्या शेतांमध्ये तब्बल 12 ते 13 भले मोठ-मोठे अजगर आढ़ळले आणि ते सर्प मित्रांच्या मदतीने पकड़ून वनाधिकार्यांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर हे सर्व अजगर जंगलात सोड़ण्यात आले आहेत. अजगर आढळल्यानंतर सर्पमित्र सागर बडगुजर आणि संदीप मालचे यांना पुनः पाचारण करण्यात आले. हे अजगर लांब आणि मोठे असल्याने त्यांना पकड़ण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तसंच भल्या मोठ्या अजगराला पकड़त असताना सर्पमित्र सागर बडगुजर यांना एका आजगराने चावा घेतला. हेही वाचा-कोण आहे ‘कोरोना’चा पहिला रुग्ण? ज्याच्यामुळे जगभर पसरला महाभंयकर व्हायरस अजगराने चावा घेतल्यानंतरही सागर बडगुजर यांनी त्या अजगराला पकडून वनखात्याच्या स्वाधीन करून जंगलात सोडले. त्यांच्या या धाडसाचे सर्व शेतकरी वर्गाने कौतुक केले. सागर बडगुजर यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटिल यांनी उपचार केले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Farmer, Jalgaon news

    पुढील बातम्या