दुर्दैवी!, बारावीत नापास होण्याच्या भीतीने 'ती'ने केली आत्महत्या पण झाली पास

दुर्दैवी!, बारावीत नापास होण्याच्या भीतीने 'ती'ने केली आत्महत्या पण झाली पास

आज बारावीचा निकाल जाहीर यात पूजा चौधरीला ६९.९२ टक्के गूण मिळाले आहे. तिचा निकाल ऐकून तिचे वडील भगवान चौधरी आणि आई भावनाविवश झाले होते.

  • Share this:

जळगाव, 30 मे : बारावीचा निकाल आज जाहीर झालाय. पण निकालातील अपयशाच्या भीतीने रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील विद्यार्थ्यांनी पूजा भगवान चौधरी या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पूजा बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली.

अहिरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान लहानू चौधरी यांची एकुलती एक कन्या पूजा भगवान चौधरी ही रावेरातील कमलाबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये शिकत होती. तिने मार्च २०१८ ची इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती.

मात्र, परीक्षेतील अपयशाच्या भीतीपोटी पूजाने काल मंगळवारी राहत्या घराच्या छताला स्वतःच्या ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आईवडिलांची लाडक्या पूजाने परीक्षेच्या निकाल घोषित होण्यापूर्वीच अपयशाचा धसका घेऊन मृत्यूला कवटाळून घेतल्याने एकच हळहळ व्यक्त होतं आहे.

आज बारावीचा निकाल जाहीर यात पूजा चौधरीला ६९.९२ टक्के गूण मिळाले आहे. तिचा निकाल ऐकून तिचे वडील भगवान चौधरी आणि आई भावनाविवश झाले होते.

First published: May 30, 2018, 7:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading