जालना, 23 मार्च : जालना (Jalana) जिल्ह्यात दीड लाखाची लाच (bribe)घेताना अप्पर तहसीलदार (Tehsildar) रंगेहात अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रॉयल्टी पावतीच्या सत्यापणासाठी 3 लाख 20 हजार तर वाळू वाहतुकीसाठी दर महिना दीड लाखाची मागणी होती.
वाळू वाहतुकदाराच्या पोलिसांनी पकडलेल्या हायवाच्या रॉयल्टी पावतीचे सत्यापन करण्यासाठी तब्बल 3 लाख 20 हजार रुपयांची लाच अप्पर तहसीलदाराने मागितली होती. अखेर दीड लाख रुपये लाच घेताना औरंगाबाद येथील अप्पर तहसीलदारांना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
किशोर देशमुख असं या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो सध्या औरंगाबाद येथे अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार हे वाळू वाहतूकदार असून त्यांनी शेंदूरवाडा येथील खाम नदीतील वाळू उपासाचे अधिकृत टेंडर घेतले आहे.
दरम्यान, वाळू वाहतूकदाराचे 2 हायवा एमआयडीसी पोलिसांनी पकडले होते. सदर हायवाच्या रॉयल्टी पावतीच्या सत्यापन करण्यासाठी 3 लाख 20 हजार रुपये आणि वाळू वाहतूक करून देण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी अप्पर तहसीलदार किशोर देशमुख यांनी केली होती.
तीरथ सिंहांनंतर भाजपच्या महिला मंत्र्याचं विधान; म्हणाल्या, 'फाटलेले कपडे..'
तब्बल दीड लाख रुपये लाच मागितल्यामुळे वाहतूकदार हवालदील झाला होता. त्यामुळे तक्रारदाराने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. अप्पर तहसीलदार किशोर देशमुख याला वाळू वाहतुकदाराच्या पोलिसांनी पकडलेल्या हायवाच्या रॉयल्टी पावतीचे सत्यापन करण्यासाठी दीड लाख रुपये स्वीकारत असताना रंगेहाथ पकडले. आरोपी किशोर देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.