...अन् थोडक्यात बचावला बळीराजा पण मुक्या सर्जा-राजांनी सोडले प्राण

...अन् थोडक्यात बचावला बळीराजा पण मुक्या सर्जा-राजांनी सोडले प्राण

नदीपात्र ओलांडून जाण्यासाठी पुलाची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना नदीपात्र ओलांडून पलिकडे जावं लागतं.

  • Share this:

जालना, 24 सप्टेंबर : राज्यात बुधवारी मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला होता. मुंबईसह राज्यभरात झालेल्य़ा पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर जालन्यातील अनेक भागांमध्ये शेतात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं आहे. जालन्यातील दुधना नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शेतातून घराकडे जात असताना बैलगाडी वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतातून घराकडे परतत असलेला एक शेतकरी बैलगाडीसह पाण्यात बुडाल्याची घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा गावात घडली. या घटनेत सुदैवानं शेतकऱ्याला वाचवण्यात यश आलं मात्र दोन्ही बैल आणि गाडी वाहून गेली. त्यांना वाचवेपर्यंत मात्र दोन्ही बैलांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा-मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी मोदींकडून विलंब? संभाजीराजे उत्तराच्या प्रतीक्षेत

ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून शेतकऱ्याला वाचवलं पण बैलांना वाचवण्यात अपयशय आलं. सुरेश कोरडे असं या पीडित शेतकऱ्याचं नाव असून लाख रुपयांची बैलजोडी गमावल्याने तो खूपच हतबल झाला. निम्न दुधना प्रकल्पात 94 टक्के जिवंत पाणीसाठा झाल्याने रविवारी सहा दरवाजे 0.5 मीटरने उघडण्यात आले असून सांडव्याद्वारे 10776 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने दुधना नदीची पाणी पातळी वाढली.

हे वाचा-युरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर

नदीपात्र ओलांडून जाण्यासाठी पुलाची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना नदीपात्र ओलांडून पलिकडे जावं लागतं. शेतातून घरी जाण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी ही कसरत करावी लागते. नदीच्या पलीकडेच हिंदू ,ख्रिश्चन, मुस्लिम स्मशानभूमी असल्याने अंत्यविधीला सुद्धा अशाच प्रकारे त्रास होतो. त्यामुळे याठिकाणी पुलाचे बांधकाम तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 24, 2020, 1:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading