नवऱ्यासोबत भांडून गेली, कोरोनाची लागण झाली, अखेर...

नवऱ्यासोबत भांडून गेली, कोरोनाची लागण झाली, अखेर...

गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर बाहेरील राज्यातून आल्यामुळे या महिलेची कोरोनाची चाचणी घेण्यात आली.

  • Share this:

जालना, 19 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून लोकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. परंतु, या काळात कौटुंबिक वादाच्या प्रकरणात वाढ झाली आहे. जालन्यात नवऱ्यासोबत भांडून जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले.

जालना जिल्ह्यातील तालुक्यातील गुंडेवाडी येथील एक 30 वर्षीय महिला पती सोबत भांडण झाल्याने 14 एप्रिल रोजी गुजरातमधील देदीपाडा जिल्ह्यातील भुतबेडा गावी गेली होती.

गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर  बाहेरील राज्यातून आल्यामुळे या महिलेची कोरोनाची चाचणी घेण्यात आली.   तिचा स्वॅब घेऊन कोरोना टेस्ट करण्यात आली. दरम्यान,15 एप्रिल रोजी तिचा वैद्यकीय अहवालात ती कोरोना पोझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. तेथील जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जालना येथील जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांना पत्राद्वारे माहिती दिली.

हेही वाचा -पोलीस मारतात म्हणून दोन तरुणांनी लावली अशी शक्कल की, गाडी कुणीच अडवली नाही, पण..

त्यानंतर जिल्हा प्रशासनासह जालनेकरांमध्ये एकच खळबळ माजली होती. दरम्यान, सदर कोरोना पोझिटिव्ह आढळून आलेली महिला तिच्या पतीसह गुंडेवाडी येथील एका कॉटन कंपनीत काम करायची. त्यामुळे तिच्या पतीसह तिच्या संपर्कात आलेल्या 16 जणांना खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तर मुंबई येथे बंदोबस्त करून परतलेल्या जालना येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 च्या 97 जवानांची प्राथमिक तपासणी करून 87 जवानांना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं तर उर्वरित10 जवानांना विलगीकरण वार्डात ठेऊन त्यांचे स्वॅब कोरोना टेस्टसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

हेही वाचा -COVID-19: सर्वात मोठी बातमी! ऑक्टोबरपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता

गुंडेवाडीतील 16, एसआरपी जवान आणि इतर 7 कोरोना संशयित अशा या सर्व 33 जणांचा कोरोना रिपोर्ट शनिवारी निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनासह जालनेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: April 19, 2020, 9:39 AM IST
Tags: jalana

ताज्या बातम्या