तब्बल 144 गुन्हे दाखल असलेली जहाल महिला माओवादी चकमकीत ठार

तब्बल 144 गुन्हे दाखल असलेली जहाल महिला माओवादी चकमकीत ठार

सी सिक्स्टी कमांडो पथकासोबत सिनभट्टीच्या जंगलात ही चकमक झाली.

  • Share this:

गडचिरोली, 2 मे: माओवाद्याच्या विभागीय समितीची सदस्य असलेली जहाल महिला माओवादी सृजनक्का चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. सी सिक्स्टी कमांडो पथकासोबत सिनभट्टीच्या जंगलात ही चकमक झाली. घटनास्थळी जहाल महिला माओवादी सृजनक्काच्या मृतदेहासह एके 47 अत्याधुनिक बंदूक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आली आहे.

सृजनक्कावर हत्या, पोलिस दलावर हल्ल्यासह जाळपोळ आणि एकूण 144 गुन्हे दाखल होते. कसनसूर आणि चातगाव या दोन दलमचे नेतृत्त्व सृजनक्काकडे होते.

कमांडर-इन-चिफने केलं आत्मसमर्पण...

दरम्यान, गेल्या फेब्रुवारीत माओवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा कमांडर-इन-चिफ व चातगाव विभागीय सदस्य विलास कोल्हा (44) याने एके-47 बंदूक, 3 मॅगजिन व 35 राऊंडसह गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं होतं. मागील 20 वर्षांपासून नक्षल चळवळीत असलेल्या विलास कोल्हा याच्यावर खून, जाळपोळ, चकमक अशी तब्बर 149 गुन्हे आहेत. राज्य शासनाने त्याच्यावर सुमारे साडे आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होतं.

या कारणामुळे केलं आत्मसमर्पण...

नक्षल चळवळीतील स्थानिक आदिवासींना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, जंगलात फितताना वेळेवर अन्न न मिळणे, सततची पायपीट, पुरेसे पैसे उपलब्ध करुन न देणे आदी कारणांना कंटाळून विलास कोल्हा या जहाल माओवादीने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नवसंजीवनी योजनेंतर्गत पोलिसांनी विलास कोल्हाचा भाऊ व नातेवाईकांना पत्र पाठवून आत्मसमर्पण करण्यास आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत विलास कोल्हा याने आत्मसमर्पण केलं.

First published: May 2, 2020, 8:23 PM IST

ताज्या बातम्या