सुसाट जग्वारचा अपघातात चक्काचूर, सीटबेल्टमुळे दोघे वाचले तर 2 जणांचा जागीच मृत्यू

सुसाट जग्वारचा अपघातात चक्काचूर, सीटबेल्टमुळे दोघे वाचले तर 2 जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ जवळील पिंपळखुटा परिसरात पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

  • Share this:

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 21 नोव्हेंबर : खड्ड्यानं यवतमाळमधील दोघांचा बळी घेतला आहे. खड्डे चुकवताना गाडी शेतात घुसली आणि दोघांना जीव गमवावा लागला. त्यामुळे आता तरी प्रशासन खड्डे बुजवणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

यवतमाळमधील राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यानं दोघांचा बळी घेतला. हैदराबाद येथील योगेश आणि किशोर हे मित्रांसह आपल्या टी एस 12- ec 9719 या जग्वार गाडीने नागपूरहुन हैदराबादकडे जात असताना पिंपळ खुटी गावाजवळ रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात गाडी आदळली आणि वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. हा अपघात एवढा भयंकर होता की, गाडी बाजूला असलेल्या कापसाच्या शेतात जवळपास 500 मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. गाडीतील चालक आणि बाजूच्या सीटवर बसलेल्या दोघांनी सीट बेल्ट लावल्यामुळे ते बचावले. मात्र, मागील सीटवर बसलेल्या दोघांना जबर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला.यवतमाळ जवळील पिंपळखुटा परिसरात पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर म्हणजे मृत्यूचा सापळा झाला. इथला रस्ता म्हणजे खड्ड्यांचं साम्राज्य....या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वाहतुकीचा वेग हा मंदावला. वाहन चालकांना खड्डा चुकवत कासव गतीनं पुढे जावं लागतंय. तर अनेकांचे जीव जात आहे. इथे लोकांचे जीव जात असले तरी असंवेदनशील प्रशासनाला मात्र त्याचं कसलंही सोयरसुतक नाही.

त्यामुळं आणखी किती बळी गेल्यानंतर हे प्रशासन महामार्गावरील खड्डे बुजवणार? असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.

===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2019 09:14 PM IST

ताज्या बातम्या