• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • LIVE Update : कोकणात पावसाचा हाहाकार, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

LIVE Update : कोकणात पावसाचा हाहाकार, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

पाऊस, कोरोना, राजकीय घडामोडी आणि इतर बातम्यांचे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 06, 2022, 00:42 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  22:1 (IST)

  एनडीआरएफच्या दोन टीम कोल्हापुरात दाखल
  जिल्हाधिकाऱ्यांकडून पावसाच्या स्थितीचा आढावा
  एक टीम शिरोळ तर एक शहरात राहणार कार्यरत
  संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासन अलर्ट

  21:56 (IST)
  नागपूर - महामेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा सन्मान प्राप्त, वर्धा रोड डबलडेकर उड्डाणपूल, मेट्रो स्थानकं रेकॉर्ड बुकमध्ये
   
  21:45 (IST)

  दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्ग विस्कळीत
  पोलादपूरच्या पुढे धामणदेवी इथं दरड कोसळली

  20:27 (IST)

  - नांदेड शहरात मुसळधार पाऊस सुरू
  - गेल्या 15 - 20 मिनिटापासून पाऊस सुरु
  - अनेक भागात वीज पुरवठा खंडित 
  - रस्ते झाले जलमय

  20:26 (IST)

  - दापोली तालक्यातील इकबालनगर येथे एका घराची संरक्षक भिंत कोसळल्याने इतर 5 घरांना धोका
  - सर्व 5 घरातील 29 नागरिकांचे जवळील उर्दू शाळेत तात्पुरते स्थलांतरण

  19:49 (IST)

  - आषाढीवारीसाठी निघालेल्या वारकाऱ्यांच्या दिंडीचा अपघात, 14 वारकरी जखमी 

  - मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ वारकरच्या दिंडीत पिकअप जीप घुसल्याने झाला अपघात

  - जखमींना मिरज सिव्हिल आणि  कवठेम्हणकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे

  - अपघातनंतर ड्रायव्हर गेला पळून

  19:47 (IST)

  सांगली - वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात
  भीषण अपघातात 14 वारकरी जखमी
  दिंडीत जीप घुसल्यानं घडला अपघात
  अपघातानंतर चालकानं केलं पलायन
  जखमींवर मिरज, कवठेमहांकाळ इथं उपचार

  19:25 (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू किरण पांडव
  किरण पांडव यांची शिवसेनेतून हकालपट्टी
  शिवसेनेच्या गडचिरोली समन्वयक पदावर होते
  शिंदेंच्या बंडात सुरत, गुवाहाटीत होते पांडव
  किरण पांडवांवर होती महत्त्वाची जबाबदारी
  शिंदेंना साथ दिल्यानं शिवसेनेतून हकालपट्टी
  शिंदे गटाला उद्धव ठाकरे गटाचा धक्का

  19:10 (IST)

  महानगरपालिकेचा पवई तलाव भरून वाहू लागला, 1890 मध्ये 40 लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव, या तलावाचं पाणी पिण्यायोग्य नसल्यानं प्रामुख्यानं औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते

  19:1 (IST)

  'राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यावा'
  राहुल शेवाळेंची उद्धव ठाकरेंना लेखी विनंती

   पाऊस, कोरोना, राजकीय घडामोडी आणि इतर बातम्यांचे अपडेट्स