माझ्यावर Phd करायला चंद्रकांत पाटलांना 10 वर्ष लागतील, पवारांचा खोचक टोला

माझ्यावर Phd करायला चंद्रकांत पाटलांना 10 वर्ष लागतील, पवारांचा खोचक टोला

या संवादात शरद पवारांनी कॉलेज निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : आज मुंबईत राष्ट्रवादीकडून युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुण पिढीसोबत संवाद साधला. युवा पिढीसोबत बोलण्याची संधी मिळाली याचा शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. तुमची पिढी आणि माझी पिढी यामध्ये किती फरक आहे, हे मला पाहायचे आहे. आता माझे वय 80 झाले आहे. मात्र प्रश्न विचारण्याची क्षमता कमी झाली नाही, असं म्हणत पवारांनी त्यांचा आमदारकीचा अनुभव तरुणांना सांगितला. अत्यंत दिलखुलास पद्धतीने पवारांनी तरुणांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरील PHD चा मुद्दा उपस्थित केला होता. यावर पवारांनी खोचक उत्तर दिले. सर्वसाधारणपणे पीएडी करायला 3 ते 4 वर्षे लागतात. मात्र माझ्यावर Phd करायला चंद्रकांत पाटलांना 10 ते 12 वर्षे लागतील असा खोचक टोला यावेळी त्यांनी लगावला.

यावेळी पवारांनी त्यांचे महाविद्यालयीन काळातील अनेक अनुभव शेअर केले. सार्वजनिक जीवनाची सुरूवात काॅलेज विश्वापासून होते. तेव्हा अभ्यास सोडून बाकी मी पारंगत होतो. मात्र त्यावेळेस जोडलेली मैत्री मी आजही जपून आहे. आजही माझ्या महाविद्यालयीन मित्रांना भेटतो, असं पवार म्हणाले.

या संवादादरम्यान शरद पवारांनी मांडलेले काही मुद्दे

-चढउतार आयुष्यात असतो, मोठ्या पदावर गेलो तरी पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. पराभव झाला तरी पुन्हा उभारी घ्यायची असते

- पवार कधी काय करतील हे सांगता येत नाही असं चित्र पत्रकार माझ्याविषय़ी निर्माण करतात मात्र नाउमेद न होता काम करत राहावे. यासाठी धाडसाने काम करावे लागते

- शैक्षणिक अभ्यास बदला पाहिजे नव्या काळानुरूप बदल केला पाहिजे

-अभ्यासक्रमातील साचेबंदपणा बदलला पाहिजे. देशातील आव्हानांनुसार अभ्सासक्रम बदलला पाहिजे.

-काॅलेज निवडणूक व्हायला हव्यात. यातून युवकांना संधी मिळते. राज्य सरकार याबाबत नक्की विचार करेल.

-नायगाव-परळ भागांत आलो की अस्वस्थ होतो. गिरण्या बंद झाल्या. सामान्य माणूस गेला आणि मोठ मोठया इमारती आल्या. औद्योगिक शहर बदलत गेलं आणि सेवा क्षेत्र आले.

-कायदे बदलले केले नाही तर तुम्ही आऊट डेटेड राहण्याची भीती असते. संबंंधित लोकांनी कायदे शिक्षणाविषयी खबरदारी घेतली पाहिजे.

-सीईटी प्रवेश परीक्षा टाईमटेबल वेळेत यायला हवेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

First published: February 23, 2020, 3:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading