मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'संस्था उभ्या करायला डोकं लागतं' अजितदादांचा नारायण राणेंना टोला

'संस्था उभ्या करायला डोकं लागतं' अजितदादांचा नारायण राणेंना टोला

 25 वर्षांपूर्वी विमानतळाचं भूमिपूजन झालं. हा आनंदाचा क्षण होता, सर्वांनी मिळून मिसळून आनंदात सहभागी होण्याचं काम होतं. एक नेते उठले आणि...

25 वर्षांपूर्वी विमानतळाचं भूमिपूजन झालं. हा आनंदाचा क्षण होता, सर्वांनी मिळून मिसळून आनंदात सहभागी होण्याचं काम होतं. एक नेते उठले आणि...

'कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका.

  • Published by:  sachin Salve

सिंधुदुर्ग, 26 डिसेंबर :  'संस्था उभ्या करायला डोकं लागतं, पण संस्था बंद करायला अक्कल लागत नाही', असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या उमेदवाराची बैठक पार पडली. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

आरोप-प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही. आणि मला कसलाही फायदा उठवायचा नाही. पण संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण संस्था बंद करायला अक्कल लागत नाही' असा टोला अजितदादांनी नारायण राणेंना लगावला.

(हेही वाचा - ओव्हरटेकच्या नादात क्रुझर आणि कारची समोरासमोर धडक, 4 जण ठार)

'कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. या बँका चांगल्या चालण्यासाठी आपले बहुमुल्य असं मत द्या. महिलांना मतदान करण्याचा, अनुसूचित जातीजमाती, मागास प्रवर्ग, ओबीसी , एनटीला मतदान करण्याचा अधिकार आहे. सतीश सावंत स्वतंत्रपणे उभे आहेत, अश्या प्रकारे महाविकास आघाडीच्या पॅनलला मतदान करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

तर त्याआधी रत्नागिरी जवळच्या मिर्या धूपप्रतिबंधक बंधाराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या जाहीर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे आणि नवाब मलिकांना खडेबोल सुनावले.

(हेही वाचा -हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन तरुण खाली कोसळला, दगडावर आपटून जागीच मृत्यू, VIDEO)

'आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे नेते आहोत. सध्या सोशल मीडिया वरून कोण कोंबड्याला मांजर करतेय तर कुणी मांजराला कोंबडा करतंय यातून कोकणच्या विकासाचे मुद्दे सुटणार आहेत का हे कुणीच करू नये, एकमेकांची उणीदुणी काढून काही होणार नाही आपण विकासावर ते बोलले पाहिजे,  असं सांगत अजित पवार यांनी नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना खडेबोल सुनावले.

First published:

Tags: Ajit pawar