मुंबईत आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडटासह दमदार पाऊस

मुंबईत आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडटासह दमदार पाऊस

या पावसामुळे मुंबईतल्या सखल भागात पाणी साचले आहे. पण रात्रीची वेळ असल्यामुळे नागरिकांना या साचलेल्या पाण्याचा फारसा त्रास झाला नाही. सकाळी देखील पावासाची रिप रिप सुरूच आहे.

  • Share this:

मुंबई,13 सप्टेंबर: मुंबई आणि परिसरात आज पहाटे पासूनच विजांचा कडकडाटासह दमदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे मुंबईतल्या सखल भागात पाणी साचले आहे. पण रात्रीची वेळ असल्यामुळे नागरिकांना या साचलेल्या पाण्याचा फारसा त्रास झाला नाही. सकाळी देखील पावासाची रिप रिप सुरूच आहे.

पावसाचा जोर वाढला तर मात्र पुन्हा एकदा मुंबईची 'तुंबई' होऊ शकते. मुंबई महापालिकेने देखील सखल भागांत पाणी साचू नये यासाठी ५८ पंप सुरू ठेवले आहेत. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात चागंला पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई उपनगरात काल रात्रभर ९६ मिलीमीटर तर दक्षिण मुंबईत ५६ मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. त्याचबरोबर पाऊस आणि वाऱ्यामुळे आतापर्यंत मुंबईच्या उपनगरात १४ झाडं पडली आहेत. मुंबईत सर्वाधिक पाऊस हा नॅशनल पार्क परिसरात झालाय.

समुद्राला  आज  संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनिटांनी भरती येणार आहे. ही भरती ३.४२ मीटर उंचीची असेल. मुंबईत जर मुसळधार पाऊस पडला तर बीएमसीची आपत्कालीन व्यवस्था सज्ज असल्याचीही माहिती महापालिकेने दिली आहे. सध्या रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2017 09:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading