मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पार्थ पवारांच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, अजित पवारांचे इतर नातेवाईकही रडारवर

पार्थ पवारांच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे, अजित पवारांचे इतर नातेवाईकही रडारवर

IT raid at Parth Pawar’s office in Mumbai: अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाचे छापे पडले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

    मुंबई, 7 ऑक्टोबर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (IT raid at Parth Pawar’s office in Mumbai) यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. पार्थ पवार यांचं मुंबईतील नरिमन पॉईंट (Raid at Parth Nariman Point office) या ठिकाणी कार्यालय आहे. तिथे आयकर विभागाने छापा घालत काही संशयास्पद कागदपत्रं शोधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिवसभर अजित पवारांच्या नातेवाईकांवर छापे ( I-T raids firms connected to Ajit Pawar’s relatives) दिवसभर अजित पवारांच्या वेगवेगळ्या नातेवाईकांवर आयकर विभागाचे छापे पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यापूर्वीच आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरांवर छापे घालून काही गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाचे छापे पडले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. कोल्हापुरातही छापा (IT Raids at Kolhapur) कोल्हापुरात अजित पवार यांच्या बहिणीचं कार्यालय आहे. त्या ठिकाणीदेखील आयकर विभागानं छापे घातल्याची माहिती आहे. अजित पवारांची बहीण विजया पाटील या पब्लिशिंग कंपनी चालवतात. त्यांचा राजकाऱणाशी तसा कुठलाही थेट संबंध नाही. त्यांच्या कंपनीची उलाढालदेखील मोठी म्हणावी, अशी नाही. मात्र त्यांच्या कार्यालयातही छापे पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आयकर विभागाच्या सहा अधिकाऱ्यांनी विजया पाटील यांच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती मिळत आहे. मात्र आयकर विभागाने याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तर विजया पाटील यांच्याशीदेखील संपर्क होऊ शकलेला नाही. हे वाचा - दादा, तुम्ही करून दाखवलंत! चिपी विमानतळ उद्घाटनावरून भाजपची पोस्टरबाजी काय आहे प्रकऱण? अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर अजित पवारांचे नातलग, भावंडं आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या कार्यालयांवर आयकर विभागानं छापे मारायला सुरुवात केली आहे. अजित पवारांनी निकटवर्तीयांच्या साथीनंच हा कारखाना खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Ajit pawar, Income tax

    पुढील बातम्या