Home /News /maharashtra /

गुन्हे दाखल करणे ही भाजपची संस्कृती नाही, दरेकरांचं खडसेंना प्रत्युत्तर

गुन्हे दाखल करणे ही भाजपची संस्कृती नाही, दरेकरांचं खडसेंना प्रत्युत्तर

'त्यांच्या जाण्याने पक्षाला काही होणार नाही, भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही'

सांगली, 21 ऑक्टोबर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपला रामराम ठोकत एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. पण आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणे ही भाजपची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. भाजपाने एकनाथ खडसे यांच्यावर कोणतेही अन्याय केला नाही. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य काळ ठरवेल. पण पक्ष सोडताना, ज्या पक्षाने मोठे केले त्यावर आरोप करणे संयुक्तिक नाही, असं प्रवीण दरेकर म्हणाले. 'थिल्लरपणावर बोलण्यासाठी वेळ नाही'  फडणवीसांना टोला हाणत खडसेंबद्दलही बोलले CM 'खडसे यांचे आता उतार वयातील राजकारण आहे. त्यामुळे खच्चीकरण केले की पक्षाने मोठं केलं. हे महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाला काही होणार नाही, भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही, असा दावाही दरेकरांनी केला. 'भाजपचे सरकार आल्यावर नऊ खाती खडसे यांच्याकडे होती. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. आता अन्यायाची फक्त एकच बाजू समोर येत आहे. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणे ही भाजपाची संस्कृती नाही, असंही प्रवीण दरेकर म्हणाले. खडसेंनी पक्ष सोडणे वेदनादायी - मुनगंटीवार तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडणे हे एक कार्यकर्ता म्हणून धक्कादायक आहे. भाजप विस्तारात खडसेंचे मोठे योगदान आहे. खडसेंनी राष्ट्रवाद जोपासणारा पक्ष ते राष्ट्रवादाचा बुरखा घालणाऱ्या पक्षात जाणे वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 'पक्ष सोडण्याआधी एकनाथ खडसेंसोबत चर्चा झाली, पण...'; चंद्रकांत पाटलांचा खुलासा सत्ता नसताना त्यांनी कार्यकर्ता बांधून ठेवला आता त्यांचा धीर खचला याबद्दल आश्चर्य वाटते. त्यामुळे खडसेंनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि गेलेच तर सुखी राहावे,  भाजप कुण्या एकाचा पक्ष नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे या घडामोडीवर चिंतन करण्याची गरज आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या