मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आठवडाभर 'या' 6 तासांमध्ये करता येणार नाही रेल्वे तिकिटाचं आरक्षण

आठवडाभर 'या' 6 तासांमध्ये करता येणार नाही रेल्वे तिकिटाचं आरक्षण

indian railways

indian railways

सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यांचे क्रमांक आणि विद्यमान प्रवासी बुकिंग डेटा अपडेट केला जाणार आहे. यासाठी सात दिवस दररोज सहा तास तिकीट बुक करणं किंवा रद्द करणं यांसारख्या सेवा दिल्या जाणार नाहीत. यामुळे तिकीट सेवांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी हे काम केलं जाणार आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 15 नोव्हेंबर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (Coronavirus Pandemic) गेल्या दीड वर्षात देशातली रेल्वेसेवाही (Railway Service) प्रभावित झाली होती. लॉकडाउनच्या (Lockdown) काळात रेल्वेसेवा बंद होती. आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानं टप्प्याटप्प्याने रेल्वेसेवा सुरू करण्यात येत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत रेल्वेसेवा पोहोचली आहे. सर्वदूर पसरलेलं रेल्वेमार्गाचं जाळं आणि स्वस्त प्रवास यामुळे सर्वसामान्य जनतेची ही सर्वांत लोकप्रिय वाहतूक सुविधा आहे. दररोज हजारो रेल्वेगाड्या देशभरात धावत असतात, तर लाखो नागरिक रेल्वेनं प्रवास करत असतात. सणासुदीच्या काळात तर रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी असते. यासाठी रेल्वेचं तिकीट आधीच आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तीन महिने आधी तिकीट आरक्षित करता येतं. आता ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध झाल्याने दररोज लाखो जण आपल्या नियोजित प्रवासासाठी तिकीट आरक्षित करतात. आता रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेनं कोरोनापूर्व काळाप्रमाणे सुरू होत असल्याने तिकीट आरक्षणासाठी गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता काही तासांसाठी रेल्वे तिकीट बुक (Railway Ticket Booking) करता येणार नाही. रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) आजपासून सात दिवस दररोज रात्री सहा तास बंद राहणार आहे. रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) ही माहिती दिली आहे. मनीकंट्रोलने याबाबतचं वृत्त दिलं आहे. रेल्वे प्रवासी सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यासाठी आणि त्या सेवा पुन्हा रुळावर आणण्याची तयारी सुरू आहे. ज्याप्रमाणे कोरोनापूर्वी रेल्वे धावत होत्या त्याप्रमाणे रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यांचे क्रमांक आणि विद्यमान प्रवासी बुकिंग डेटा अपडेट केला जाणार आहे. यासाठी सात दिवस दररोज सहा तास तिकीट बुक करणं किंवा रद्द करणं यांसारख्या सेवा दिल्या जाणार नाहीत. यामुळे तिकीट सेवांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी हे काम केलं जाणार आहे. औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप हा उपक्रम 14 आणि 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 20 आणि 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालेल. रात्री 11:30 ते पहाटे 05:30 पर्यंत कोणतीही पीआरएस सेवा म्हणजे तिकिटं बुक करणं, तिकीट रद्द करणं आदी या सर्व सेवा बंद राहतील. पीआरएस सेवा वगळता, इतर सर्व चौकशी सेवा, जसं की 139 क्रमांकाची सेवा, पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. अरबी समुद्रात पुन्हा नवं संकट; राज्यात पुढील 5 दिवस महत्त्वाचे, मुंबई-पुण्यालाही इशारा आतापर्यंत 148 रेल्वेगाड्यांचे क्रमांक बदलण्यात आले असून, अन्य काही बदलही केले जात आहेत. दरम्यान, शुक्रवारी (12 नोव्हेंबर) भारतीय रेल्वेने पूर्व मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणार्‍या नियमित मेल, एक्स्प्रेस आणि फेस्टिव्ह स्पेशल ट्रेनसाठी विशेष गाड्यांचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सध्या ज्या गाड्यांमध्ये सर्वसामान्य वर्गासाठी आरक्षणाची व्यवस्था आहे, ती पूर्वीप्रमाणेच राहील, असंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
First published:

Tags: Railway, Reservation

पुढील बातम्या