Home /News /maharashtra /

मोठी बातमी! शाळा सुरू करणं बंधनकारक नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मोठी बातमी! शाळा सुरू करणं बंधनकारक नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही.

    मुंबई, 20 नोव्हेंबर: येत्या सोमवारपासून (23 नोव्हेंबर) राज्यातील (Maharashtra) नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण, शाळा (School) सुरू करणे बंधनकारक नाही, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, येत्या सोमवारपासून राज्यात शाळा सुरू करत आहे. पण शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. हेही वाचा...'News18 लोकमत' इम्पॅक्ट! 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच, BMC नं घेतला मोठा निर्णय राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळी परिस्थतीत कोरोनाची काय आहे, हे ठरवून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असंही बंधन नसणार आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्यांना अॅटेन्डेन्स मार्क्स यावर परिणाम नाही, असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज्यात सध्या कोरोना (Coronavirus)नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे. 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंदच, BMC नं घेतला मोठा निर्णय दिवाळीनंतर कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा उद्रेक झाल्याने मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai municipal Corporation) मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (23 नोव्हेंबर) मुंबई महापालिका क्षेत्रातील एकही शाळा (Mumbai School) सुरू होणार नाही. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळा बंदच राहातील, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी 'News18 लोकमत'शी माहिती दिली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असताना 23 नोव्हेंबर शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. हेही वाचा...यशोमती ठाकूर यांनी अमृता फडणवीसांचं केलं कौतुक म्हणाल्या... 'News18 लोकमत'ने विशेष वृत्तमालिका सुरू केली होती. याबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची मतं जाणून घेतली होती. त्यानंतर महापालिकेकडे पाठपुरवा देखील केला होता. त्यानंतर महापालिकेने शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईत एकही शाळा सुरू होणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे. मार्च महिन्यापासून राज्यातली शाळा कॉलेजेस बंद असून Online अभ्यास सुरू आहे. दिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Maharashtra, School

    पुढील बातम्या