शाळेत अतिरिक्त साहित्य खरेदी बंधनकारक नाही !

याबाबत कुठल्याही शाळेत 25 टक्के पालक एकत्र येऊन शाळेविरोधात तक्रार करू शकतात. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळालाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2018 09:56 PM IST

शाळेत अतिरिक्त साहित्य खरेदी बंधनकारक नाही !

20 मार्च : खाजगी शाळांच्या मनमानी फी वाढीला सरकारनं चाप लावलाय शाळेतील अतिरिक्त साहित्य खरेदीच्या सक्ती बंधनकारक नसल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या लक्षवेधीवर शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी विधानसभेत घोषणा केली.

शाळेत या ना मार्गाने पालकांची लूट केली जाते. कधी कपडे, कधी पुस्तकांच्या नावाने पालकांना भुर्दंड पाडला जातो. याचा विषयावरआज अधिवेशनात अतिरिक्त साहित्य खरेदीच्या सक्ती बंधनकारक नसल्याचं भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या लक्षवेधी सादर केली. यावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळेतील अतिरिक्त साहित्य खरेदीच्या सक्ती बंधनकारक नाही. याबाबत कुठल्याही शाळेत 25 टक्के पालक एकत्र येऊन शाळेविरोधात तक्रार करू शकतात असंही तावडेंनी जाहीर केलं.

त्याचबरोबर केंद्राच्या आदेशानुसार शाळेची गुणवत्ता आणि दर्जा पालकांना कळण्यासाठी सेल्फ डिक्लेरेशनला गती दिली जाईल याविषयीचा सरकारकडून लवकच वटहुकूम निघणार असल्याचंही तावडेंनी स्पष्ट केलं. सरकारच्या या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2018 09:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...