नाशिक, 22 ऑक्टोबर : नाशिकमधील एका दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरलं आहे. जेलरोड येथील कन्या शाळेसमोर रस्ता ओलांडताना मालट्रकने उडविल्याने लाखलगाव येथील पती-पत्नीचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते व वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली घटनास्थळी दाखल झाले.
जेलरोडच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने दाम्पत्याला जोरदार धडक दिली व यामध्ये त्या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर चालक शेख हसन भिकन याच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा-वकीलांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची अखेर मुभा, मात्र पहिले जाणून घ्या नियम!
दरम्यान जेलरोडमार्गे नांदूर नाका ते बिटको चौक दरम्यान अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. मात्र नांदूर नाका येथून अवजड वाहने येत असतात. त्यामुळे येथे पोलिसांनी येथे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर गावातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. दाम्पत्य एकत्र रस्ता क्रॉस करीत होते. त्यातच भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली व या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Road accident