मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपची साथ सोडणार आणि ठाकरेंना जावून मिळणार? महादेव जानकरांची सविस्तर प्रतिक्रिया

भाजपची साथ सोडणार आणि ठाकरेंना जावून मिळणार? महादेव जानकरांची सविस्तर प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जे घडतंय ते कल्पनेच्या पलिकडे आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जे घडतंय ते कल्पनेच्या पलिकडे आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जे घडतंय ते कल्पनेच्या पलिकडे आहे.

  • Published by:  Chetan Patil
प्रशांत लिला रामदास, नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. राज्याच्या राजकारणात सध्या जे घडतंय ते कल्पनेच्या पलिकडे आहे. शिवसेना सारख्या मोठ्या प्रादेशिक पक्षात फूट होणं हे आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. या धक्क्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे राज्याचा सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. नवं सरकार स्थापन होवून महिना उलटला तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जर मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले किंवा त्यांच्याविरोधात निकाल लागला तर महाराष्ट्रात पुन्हा सत्तापेच निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुकादेखील आहेत. या दरम्यान माजी मंत्री आणि रासप नेते महादेव जानकर आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांचीदेखील भेट घेतली. त्यामुळे जानकर पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जावून मिळणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. भाजप-शिवसेना युतीचं सरकार असताना महादेव जानकर हे मंत्री होते. त्यानंतर विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर जानकर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच जानकर यांनी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात स्वतंत्र निवडणुका लढणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे जानकर भाजपपासून फारकत घेणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं होतं. दुसरीकडे राज्याच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे गट आणि दुसरा उद्धव ठाकरेंचा गट चर्चेत आहे. जानकर आणि भाजपमध्ये आलेला दुरावा पाहता ते ठाकरेंना जावून मिळणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर देवून टाकलं. महादेव जानकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार का? "राजकारणात जर-तरला किंमत नाही. मी सध्या एनडीएसोबत आहे. त्यामुळे या बोलण्याला अर्थ नाही", असं म्हणत महादेव जानकर यांनी या चर्चेवर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. यावेळी जानकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "असं काही नाही. माझ्यापेक्षा शरद पवार आणि भाजपचे संबंध चांगंले आहेत", असं विधान त्यांनी केलं. (Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचं धूमशान, दोन दिवस प्रचंड महत्त्वाचे, पाच दिवसांचा अलर्ट, पूरस्थितीचा धोका) यावेळी महादेव जानकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात रासपला जागा मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "आम्ही एनडीएमध्ये आहोत. आमच्या पक्षाचे दोन आमदार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमची चर्चा झालेली नाहीय. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी उपमुख्यमत्र्यांची भेट घेतलेली आहे. मी स्वत: देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे", अशी माहिती दिली. महादेव जानकरांना यावेळी पुढच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. "प्रत्येकाने प्रत्येकाची ताकद तयार करावी. बारामतीत भाजप लढत असतील तर ते त्यांचा उमेदवार ठरवतील. त्यांनी आम्हाला मित्रपक्ष म्हणून विचारलं तर आम्हीदेखील तयारी करु. बारमतीच्या जनतेचं अभिनंदन करेन, ज्यावेळी 2014 रोजी निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा त्या जनतेनं पावणे पाच लाख मतं दिली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आता भाजप आणि रासपच्या युत्तीत भाजपने ती जागा रासपसाठी सोडली तर आम्ही लढण्याची तयारी ठेवू", असं जानकर म्हणाले.
First published:

पुढील बातम्या